वाहनचालकांवर पाणी भरलेल्या पिशव्या फोडल्याने अपघातांची शक्यता !

कल्याण-शीळ रस्त्यावरील प्रकार !

प्रतिकात्मक छायाचित्र

कल्याण – प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला बंदी असतांनाही होळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पिशव्या फेकल्या जात आहेत. वाहनचालकांवर या पिशव्या फेकल्या जात असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे; मात्र असे करणार्‍यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

इमारतीच्या खिडक्यांमधून, गल्लीबोळात लपून रस्त्यावरून जाणार्‍या दुचाकीस्वारांवर हे फुगे फेकले जात आहेत. कल्याण-शीळ रोड हा महामार्ग असल्याने तेथे वाहनांचा वेग प्रचंड असतो. अशातच फुगे फेकल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ‘पोलिसांकडून या उपद्रवींवर कारवाई केली जावी’, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःचे कर्तव्य का बजावत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका

असे करणार्‍या संबंधितांवर पोलीस कारवाई कधी करणार ?