उरुळी कांचनजवळील (पुणे) भवरापूर येथे ‘अंनिस’चा ‘स्मशान भेट’ कार्यक्रम !

भूते पहाण्यासाठी किंवा त्यांचे अस्तित्व जाणवण्यासाठी सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची आवश्यकता असते. सूक्ष्म ज्ञानेंद्रिय साधना करूनच जागृत होतात, हे नास्तिकतावाद्यांना केव्हा समजणार ? असे हास्यास्पद उपक्रम राबवून नास्तिकतावादी स्वतःचेच हसे करून घेत आहेत !

गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई !

पोलीस प्रशासनाने एकूण ४० हिंदु कार्यकर्त्यांवर कारवाईची सिद्धता केली होती. ही गोष्ट विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांना समजल्यावर त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिसांना तात्पुरते नमते घ्यावे लागले.

सातारा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुभाष महाराज घाडगे यांचे देहावसान !

ह.भ.प. सुभाष महाराज सनातन संस्थेशी गेल्या २० वर्षांपासून जोडलेले होते. ते कीर्तनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती आणि धर्मशिक्षण यांविषयीची माहिती १५ मिनिटे उपस्थितांना सांगायचे. त्यांनी याआधी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमालाही भेट दिली होती.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या ७ धरणांत अल्प पाणीसाठा !

यंदा पाऊस अल्प पडल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. मुंबईला या सात धरणांतून प्रतिदिन ३ सहस्र ९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो.

एकनाथ खडसे १५ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार !

‘येत्या १५ दिवसांत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश सोहळा देहली येथे होणार आहे’, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

मुंबईत २ नवी पक्षीगृहे उभारणार !

‘एच्केएस् डिझायनर अँड कन्सल्टंट इंटरनॅशनल’ हे आस्थापन हा प्रकल्प उभारण्यासाठी साहाय्य करणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका सुमारे ५० कोटी रुपये खर्च करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे महायुतीची अनुकूलता विजयात परावर्तित होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हापासून हिंदुत्वाचे सूत्र मनसेने हाती घेतले, तेव्हापासून त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.

अमली पदार्थ विक्री प्रकरणात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करणारा अटकेत !

एम्.डी या अमली पदार्थाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा, तसेच अमली पदार्थ विकणार्‍या टोळीसाठी पैशांची देवाणघेवाण करणारा हवाला व्यावसायिक जेसाभाई मोटाभाई माली याला पोलिसांनी अटक केली आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली मतदारसंघात मतदानपेट्यांसाठी २९ लाखांचा सुरक्षा कक्ष बांधण्यात येणार !

या कक्षामध्ये मतमोजणी केंद्रे, मतदानानंतर मोहोरबंद मतदान यंत्रे आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे ठेवण्यात येणार आहेत.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर सरकार पक्षाला म्हणणे मांडण्यास १८ एप्रिलपर्यंत मुदत !  

अंनिसच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील एक संशयित अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी १ एप्रिल २०२४ या दिवशी सीबीआयचे (केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे) अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंग यांच्या विरोधात ‘सिंग यांनी शपथेवर न्यायालयात खोटी माहिती दिली.