भाजपच्या मुख्य प्रचारकांमध्ये महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश !

लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने देशभरातील नेत्यांच्या मुख्य (स्टार) ४० प्रचारकांची पहिली सूची घोषित केली आहे.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर, ९ उमेदवारांची घोषणा !

उमेदवारांची नावे घोषित करण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची नावे घोषित !

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईमध्ये काँग्रेसला उमेदवारी न मिळाल्यामुळे अप्रसन्नता व्यक्त केली आहे. मुंबईतील जागांविषयी महाविकास आघाडीमध्ये अद्याप निर्णय व्हायचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात साजरा झाला देहू (पुणे) येथे तुकाराम बीज सोहळा !

संत तुकाराम महाराजांच्या ३७६ व्या बीज सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूमध्ये पोचले होते. भजनी दिंड्यांचा जागर, काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा, टाळ अन् मृदंग यांसोबत चिपळ्यांची साथ अशा भक्तीमय वातावरणामध्ये ‘तुकाराम बीज’ सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा झाला.

Polluted Panjim Smart City : पणजी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे होणारी नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या ?

‘‘स्मार्ट सिटी’ची एकूण ४७ पैकी ३५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर १२ कामे राहिली आहेत. सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येतील. सरकारला या समस्येविषयी ठाऊक आहे आणि सरकार या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.’’ – राज्याचे महाधिवक्ता

Tax Free Swatantryaveer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गोव्यात करमुक्त करा !

हा चित्रपट विद्यार्थीवर्गापासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच पहावा, असाच आहे. त्यामुळे हा चित्रपट गोवा राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Goa Loksabha Elections 2024 : पणजी येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेत भाजपच्या नेत्यांचा प्रचाराला प्रारंभ !

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपे, काही मंत्री आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी, तसेच मगोचे श्री. सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती होती.

वाशी आणि सानपाडा येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त २८ मार्च या दिवशी वाशी, तुर्भे, सानपाडा परिसरात विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारवाड्याची दुरवस्था !

मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा पुणे महापालिका सुस्थितीत ठेवू न शकणे, हे इतिहासाचा अभिमान नसल्याचेच द्योतक !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे २८ मार्चला घोषित करणार ! – अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९९ टक्के जागा अंतिम झाल्या आहेत. २८ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात येणार आहेत