चंडीगड विद्यापिठातील ६० विद्यार्थिनींचे आंघोळ करतांनाचे व्हिडिओज सामाजिक माध्यमांतून प्रसारित

८ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न : एकीची प्रकृती चिंताजनक
विद्यापिठातील एका तरुणीने व्हिडिओज बनवून मित्राला पाठवल्यावर त्याने केले प्रसारित !

अटक केलेल्या ७ जणांना केवळ एका दिवसात जामीन !

जत तालुक्यातील लवंगा येथे ४ साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी २२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील ७ आरोपींना अटक करून १५ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता या सर्वांना जामीन संमत करण्यात आला. या प्रकरणातील १५ आरोपी अद्याप पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

जगात शांतता नांदण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आवश्यकता ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘श्री गणेश नाईक ब्लड डोनर चैन’च्या वतीने नेरूळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम जवळपास वर्षभर ठप्प !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात असलेल्या मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम जवळपास वर्षभर झाले ठप्प आहे. कुंडाच्या शेजारी असलेल्या एका इमारतीमधील एका दुकानदाराकडून सहमती आलेली नाही. त्यामुळे या इमारतीची हस्तांतर प्रक्रिया रखडली आहे.

ठाणे जिल्ह्यातील जनावरांना लंपी आजाराचा संसर्ग झाल्यास ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क करा ! – डॉ. रूपाली सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद

ठाणे जिल्ह्यातील लंपी त्वचारोगासंबंधीची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

स्वारगेट पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई !

महानगरपालिकेच्या स्वारगेट पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. स्वारगेट पोलीस ठाणे आणि पुणे शहर येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू असून व्यंकटेश पाटील असे आरोपीचे नाव आहे.

ठाणे येथे भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात घोषणा !

ठाणे रेल्वेस्थानक परिसरात १७ सप्टेंबर या दिवशी ‘शिंदे-फडणवीस साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आली, तर ‘५० खोके एकदम ओके’, ‘ईडी सरकार हाय हाय’ अशा घोषणा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

सामुदायिक कॉपीप्रकरणी सोलापूर येथील ३१९ विद्यार्थी १ वर्षासाठी निलंबित !

मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! कॉपी करणार्‍या सर्वत्रच्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची कारवाई केल्यास कॉपी प्रकरणांवर आळा बसेल !

पुणे येथे ‘सेक्स तंत्र’ शिबिराचे आयोजक रवि सिंह यांच्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

‘सत्यम शिवम सुंदरम् फाऊंडेशन’चे संस्थापक रवि सिंह याने १५ सप्टेंबर आणि त्याअगोदर ‘सेक्स तंत्र’ या नावाने विज्ञापन सिद्ध करून समाजमाध्यमांवर प्रसारित केले. विज्ञापनामध्ये स्त्री आणि पुरुष यांचे अश्लील छायाचित्र छापून त्याचे जाहीर प्रदर्शन, तसेच प्रसारण केले आहे.

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवसेनेतून फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल. असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका.