स्वारगेट पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई !

पुणे – महानगरपालिकेच्या स्वारगेट पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. स्वारगेट पोलीस ठाणे आणि पुणे शहर येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू असून व्यंकटेश पाटील असे आरोपीचे नाव आहे. धायरी परिसरातील पाण्याच्या संदर्भात केलेल्या कामांचे प्रलंबित असलेले ४ लाख रुपयांचे देयक संमत करून देण्यासाठी आरोपीने ३० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारली आहे. या घटनेची पडताळणी करून आरोपीवर कारवाई केली. (भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी कार्यालयांमध्ये कुणाचा अंकुश नाही, असेच वाटते. अशा भ्रष्टाचारी कर्मचार्‍यांना नोकरीतून तात्काळ निलंबित करायला हवे. – संपादक)