अटक केलेल्या ७ जणांना केवळ एका दिवसात जामीन !

लवंगा (सांगली) येथे ४ साधूंना मारहाण केल्याचे प्रकरण

लवंगा (जिल्हा सांगली) – जत तालुक्यातील लवंगा येथे ४ साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी २२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील ७ आरोपींना अटक करून १५ सप्टेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता या सर्वांना जामीन संमत करण्यात आला. या प्रकरणातील १५ आरोपी अद्याप पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.