जगात शांतता नांदण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आवश्यकता ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

गणेश नाईक

नवी मुंबई – जगात शांतता नांदण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व कार्यक्षम ठरेल, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथे केले. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘श्री गणेश नाईक ब्लड डोनर चैन’च्या वतीने नेरूळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

गणेश नाईक पुढे म्हणाले की, देशातील जनतेला विश्वास आहे की, पंतप्रधानांचा प्रत्येक श्वास देशाचा विकास आणि स्वाभिमान यांच्यासाठीच असेल. त्यांना दीर्घायुष्य मिळावे.

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात सेवा पंधरवडा साजरा होत आहे. या अंतर्गत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्व प्रभागांमध्ये विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री रामकृष्ण नेत्रालयाच्या वतीने नेत्रचिकित्सा शिबिर भरवण्यात आले होते.