Modi Greeted Maldives President : पंतप्रधान मोदी यांच्याकडून मालदीवच्या राष्ट्रपतींना ईदच्या शुभेच्छा !

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, ईदचा हा विशेष सण जगभरातील लोकांना करुणा, बंधुता आणि एकता यांची आठवण करून देतो.

Hamas Leader 3 Son Killed : हमासच्या प्रमुखाची ३ मुले, ३ नातवंडे यांना इस्रालयने केले ठार !

मुलांना ठार केल्याने हमासच्या भूमिकेत कोणताही पालट होणार नाही ! – हमास प्रमुख

Joe Biden On Netanyahu : गाझा युद्ध हाताळण्यात नेतान्याहू यांनी चूक केली ! – जो बायडेन

त्यासह बायडेन यांनी प्रशासनाला गाझा भागांत अधिकाधिक साहाय्य पोचवण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदी भारताचा चेहरा बनले आहेत ! – अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन

वर्ष २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे आणि देशाची आर्थिक प्रगती यांसाठी अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे भारताचा चेहरा बनले आहेत.

मालदीवला कट्टर इस्लामिक देश बनवण्याचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांचे षड्यंत्र !

मुइज्जू यांना मालदीवचे इस्लामीकरण करायचे आहे; मात्र मुसलमानांवर अत्याचार करणार्‍या चीनचे मात्र तो समर्थन करतो, हे कसे ? यातून मुइज्जू यांचा दुटप्पीपणा दिसून येतो !

US Envoy Eric Garcetti : जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची इच्छा असणार्‍यांनी भारतात यावे !

आज भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली असून येणार्‍या दशकांमध्ये चीन आणि अमेरिका यांनाही ती शह देऊ शकते. अमेरिकी अर्थव्यवस्थाही खिळखिळी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच ती भारताचे कौतुक करीत आहे !

Sittwe Port : म्यानमारचे सिटेवे बंदर भारताच्या नियंत्रणात !

ईशान्य भारतातील राज्यांना संपर्क करण्यासाठी पर्यायी मार्ग मिळणार !

हिंद महासागरात चीनने तैनात केल्या आहेत हेरगिरी करणार्‍या ३ नौका !

दक्षिण चीन समुद्रात तेथील देशांवर सागरी दबाव आणल्यानंतर चीनने आता हिंदी महासागर क्षेत्रात किमान ३ चिनी सर्वेक्षण आणि पाळत ठेवणार्‍या नौका तैनात केल्या आहेत. चीनला वर्ष २०२५ पर्यंत हिंदी महासागरात गस्त घालायची आहे.

Canada Election China Interference : कॅनडातील निवडणुकींत चीनचा हस्तक्षेप; दोन्ही वेळा ट्रूडो विजयी ! – गुप्तचर संस्था

यावरून भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर खलिस्तानधार्जिण्या ट्रुडो यांचा बुरखा फाडला पाहिजे !

Father Of God Particle : ‘गॉड पार्टिकल’चे संशोधक ब्रिटीश शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचे ९४ व्या वर्षी निधन !

ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ आणि ‘गॉड पार्टिकल’च्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले वैज्ञानिक पीटर हिग्ज यांचे निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. त्यांनी ‘हिग्ज-बोसॉन कण’, म्हणजेच ‘गॉड पार्टिकल’चा शोध लावला होता.