Modi Greeted Maldives President : पंतप्रधान मोदी यांच्याकडून मालदीवच्या राष्ट्रपतींना ईदच्या शुभेच्छा !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू

नवी देहली – मालदीवसमवेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांना ११ एप्रिलला ईदनिमित्त शुभेच्छा संदेश पाठवला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, ईदचा हा विशेष सण जगभरातील लोकांना करुणा, बंधुता आणि एकता यांची आठवण करून देतो. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक जगासाठी हे आवश्यक आहे. भारत आणि मालदीव यांमधील सामायिक संस्कृती आणि सभ्यता यातूनच दोन्ही देश दीर्घकाळापासून एकमेकांशी जोडले गेले आहेत.