देवत्वाचा अपमान होणार नसेल, तरच घराला देवतेचे नाव द्या !

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मशास्त्रीय सिद्धांत असल्याने घराला देवतेचे नाव दिल्यानंतर देवतेच्या नावासह तिचा स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्रित येते.

वास्तूत रक्षण होऊन सुरक्षाकवच निर्माण होण्यासाठी देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे

सनातनने बनवलेल्या अशा पट्ट्याांतील नामजपातील अक्षरे आणि बाजूची किनार अशा रीतीने बनवण्यात आली आहे की, त्यांतून त्या त्या देवतेची स्पंदने अधिकाधिक प्रमाणात येतात.

वास्तूमध्ये चांगली स्पंदने कशी निर्माण करावी ?

वास्तू कितीही चांगले झाली, तरी तिच्यातील व्यक्ती जोपर्यंत धर्माचरण करत नाही, साधना करत नाहीत, तोपर्यंत त्यातील चांगली स्पंदने टिकत नाहीत.

घराला कोणता रंग द्यावा ?

रंगांची निवड घराची दिशा आणि घरमालकाचा जन्मदिनांक या दोन निकषांवर आधारित असावी लागते. प्रत्येक दिशेसाठी एक रंग ठरलेला असतो; परंतु कधीकधी तो घरमालकाच्या दृष्टीने योग्य नसतो. म्हणूनच घरमालकांनी वास्तूशास्त्रात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच रंगांची निवड करावी.

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी !

ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी.

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्व !

‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते ? हे लक्षात येण्यासाठी त्यामागचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन येथे देत आहोत.

जगद्गुरु शंकराचार्य यांनी वर्णिलेले नैवेद्य आणि प्रसाद यांचे महत्त्व

परमेश्‍वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्यापुढे नतमस्तक होतो, अहंकाररहित होतो. त्याला स्वच्छ आणि निर्मळ मनाची अनुभूती येते. हेच महत्त्व आहे नैवेद्य आणि प्रसाद यांचे !’’

अंगठी अनामिकेत का घालावी ?

अंगठी प्रवाहीपणाचे प्राबल्य दर्शवणार्‍या आपतत्त्वाचे दर्शक असलेल्या अनामिकेत घातली जाते; कारण जिवाचा देहसुद्धा पृथ्वी आणि आप तत्त्वाच्या प्राबल्याने बनलेला असल्याने जिवाला अंगठीच्या प्रवाहीपणाच्या स्तरावर लाभ मिळू शकतो.

ग्रहपीडा टाळण्याच्या दृष्टीने अलंकारांचे असलेले महत्त्व

ग्रहांचा मनुष्याच्या जीवनावर मोठा प्रभाव असतो. ग्रहपीडा निवारणासाठी किंवा ती होऊ नये, यासाठी विविध रत्नांनी युक्त असलेल्या अंगठ्या घालण्याविषयीचे विवेचन (माहिती) ज्योतिषशास्त्रात दिलेले असते.