सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणार्‍या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व

‘सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.’

साधकावरील देवऋण आणि पितरऋण काही प्रमाणावर न्यून होण्यास साहाय्य होणे

अक्षय्य तृतीयेला सात्त्विकतेच्या प्रक्षेपणामुळे चांगले वाटण्याचे सरासरी प्रमाण ६० ते ७० टक्के इतके असते, तर पूर्वजांचा त्रास होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असते.

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे पंचांग पूजन आणि श्रवण

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असत. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता.

गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची सामूहिक प्रतिज्ञा आणि प्रार्थना

गुढीपाडवा हा हिंदूंच्या यशाचा आणि विजयोत्सवाचा दिवस आहे. या शुभमुहूर्ताच्या दिवशी केलेली प्रतिज्ञा (संकल्प) आणि प्रार्थना फलद्रूप होत असल्याने पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा आणि प्रार्थना करावी.

गुढीची पूजा करतांना आणि गुढी उतरवतांना करावयाची प्रार्थना

‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य आणि सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू देे.

गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !

गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. सध्या काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराची तत्सम काही भांडी गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते. ‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते ?

आंब्याच्या पानाचे महत्त्व

इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानात अधिक सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात.

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी !

ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी.

कडूलिंबाच्या पानाचे महत्त्व

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्त्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते.