मानसिक आरोग्य महत्त्वाचे !

एका अभ्यासानुसार कोरोना महामारीनंतर नैराश्य आणि चिंताग्रस्त लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला लोक कसे सामोरे जात आहेत ? याचे सर्वेक्षण करण्यात आले.

महिला आयोग आपल्या दारी ?

आता नव्याने पुन्हा हा उपक्रम चालू केला, हे महिलांच्या दृष्टीने आशादायक आहे; परंतु शासनकर्त्यांनी अध्यक्षपद कुणामुळे रिक्त राहिले ? असे पुन्हा होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करणार ? हेही पहायला हवे.

स्कूल जिहाद ?

कर्नाटक राज्यातील गुंडलूपेट शहरात बकरी ईदच्या दिवशी शाळेतील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दर्गा (मुसलमानांचे थडगे असलेले ठिकाण) आणि मशीद यांमध्ये फिरण्यासाठी नेण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा !

नंदुरबार जिल्ह्यात तापी आणि नर्मदा अशा महत्त्वाच्या २ नद्यांना पावसाळ्यात महापूर येतो. त्यामुळे तेथे जीवित आणि वित्त हानी होत असते. त्यामुळे लाखो रुपये व्यय करून खरेदी झालेल्या आपत्ती व्यवस्थापना’च्या साहित्याविषयी प्रशासनाची उदासीनता जनतेच्या मुळावरच उठणारी आहे.

शिक्षकांवरच अंकुश ठेवण्याची वेळ !  

चंद्रपूर येथील शिक्षकाने ७ शालेय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. शिक्षकांमधील वाढत चाललेली वासनांधता शिक्षण विभागासाठी लज्जास्पद असून यातून त्यांची नीतीमत्ता खालावत जाणे दुर्दैवी आहे.

सकारात्मकता निर्माण करणारे भारतीय साहित्य !

भारतीय साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांवर नकारात्मक संस्कार झाल्याचे एकही उदाहरण नाही. अशा भारतीय साहित्याची श्रेष्ठता लक्षात घेऊन त्याचा वापर जीवन समृद्ध करण्यासाठी करूया !

अल्पावधीतील श्रीमंती घातक !

आपण कशावर स्वाक्षरी केली आहे, हे गुंतवणूकदारालाही ठाऊक नसते. अशी प्रकरणे थांबवायची असल्यास नागरिकांना सजग व्हावेच लागेल, तसेच अशा प्रकारे घोटाळे करणार्‍यांना अल्पावधीत कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी पुढे असे घोटाळे करण्याचे धाडस करणार नाही !

महागाईचा विळखा !

सरकारने अप्रामाणिक लोकांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करायला हवी. त्यातून खर्‍या अर्थाने सामान्यांना यातून दिलासा मिळेल. अन्यथा महागाईचा विस्फोट होऊन शेजारील राष्ट्रांप्रमाणे आपल्या राष्ट्राचे दिवाळे निघायला वेळ लागणार नाही !

नामांतराला विरोध का ?

सहस्रो हिंदूंची हत्या करणार्‍या औरंगजेबाच्या नावाचा आग्रह करणार्‍यांनी विकासाच्या गोंडस नावाखाली नामांतराला विरोध करून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये. याउलट नामांतराने हिंदूंमध्ये होणारे मानसिक परिवर्तन हाच खरा विकास असून त्याआधारे हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांची पताका उंचावत जाणार आहे.

प्रसारमाध्यमांनो, आदर्श व्हा !

समाज परिवर्तनासाठी सत्ता आणि राजकारण असते. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांनी समाजाला केंद्रस्थानी ठेवून काम केले पाहिजे. आठवड्यातील ७ दिवस आणि दिवसातील २४ घंटे राजकीय बातम्या दाखवणे, त्यांची अवास्तव प्रसिद्धी करणे, त्यांचे दर्जाहीन समालोचन करणे, असभ्य भाषेत बोलणे या गोष्टी थांबल्याच पाहिजेत !