सकारात्मकता निर्माण करणारे भारतीय साहित्य !

भारतीय साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांवर नकारात्मक संस्कार झाल्याचे एकही उदाहरण नाही. अशा भारतीय साहित्याची श्रेष्ठता लक्षात घेऊन त्याचा वापर जीवन समृद्ध करण्यासाठी करूया !

अल्पावधीतील श्रीमंती घातक !

आपण कशावर स्वाक्षरी केली आहे, हे गुंतवणूकदारालाही ठाऊक नसते. अशी प्रकरणे थांबवायची असल्यास नागरिकांना सजग व्हावेच लागेल, तसेच अशा प्रकारे घोटाळे करणार्‍यांना अल्पावधीत कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी पुढे असे घोटाळे करण्याचे धाडस करणार नाही !

महागाईचा विळखा !

सरकारने अप्रामाणिक लोकांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करायला हवी. त्यातून खर्‍या अर्थाने सामान्यांना यातून दिलासा मिळेल. अन्यथा महागाईचा विस्फोट होऊन शेजारील राष्ट्रांप्रमाणे आपल्या राष्ट्राचे दिवाळे निघायला वेळ लागणार नाही !

नामांतराला विरोध का ?

सहस्रो हिंदूंची हत्या करणार्‍या औरंगजेबाच्या नावाचा आग्रह करणार्‍यांनी विकासाच्या गोंडस नावाखाली नामांतराला विरोध करून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये. याउलट नामांतराने हिंदूंमध्ये होणारे मानसिक परिवर्तन हाच खरा विकास असून त्याआधारे हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांची पताका उंचावत जाणार आहे.

प्रसारमाध्यमांनो, आदर्श व्हा !

समाज परिवर्तनासाठी सत्ता आणि राजकारण असते. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांनी समाजाला केंद्रस्थानी ठेवून काम केले पाहिजे. आठवड्यातील ७ दिवस आणि दिवसातील २४ घंटे राजकीय बातम्या दाखवणे, त्यांची अवास्तव प्रसिद्धी करणे, त्यांचे दर्जाहीन समालोचन करणे, असभ्य भाषेत बोलणे या गोष्टी थांबल्याच पाहिजेत !

मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात !

तराजूत तोलल्यास इंग्रजी आणि मराठी यांमध्ये मराठीचे पारडे जड व्हायला हवे. मराठीला पुनर्वैभव मिळवून देणे मराठीजनांच्याच हातात आहे. बालकरूपी मातीच्या गोळ्याला मराठमोळे घडवा, त्याला इंग्रजाळलेले करू नका. त्यातच त्याचे उज्ज्वल भविष्य सामावलेले आहे !

पांडुरंगाला शरण जा !

ज्याप्रमाणे भक्त ‘पंढरपूरमध्ये पांडुरंग आहे’, हे अनुभवतात, तसेच प्रशासन पांडुरंगाला शरण गेल्यास त्यांनाही त्याचे अस्तित्व अनुभवता येईल. प्रत्यक्ष पांडुरंगाला शरण जाऊन नियोजन केल्यास तो ‘कुठे काय करायला हवे’, हे कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून सुचवेल आणि सर्व व्यवस्थित होईल, हे नक्की !

प्लास्टिकला हद्दपार करूया !

‘प्रशासनाने नियम किंवा दंड लावल्यावरच मी सुधारीन’, ही मानसिकता आता पालटायला हवी. प्रत्येकाने स्वतःचे दायित्व समजून प्लास्टिकचा वापर बंद करायला हवा. आपण प्रशासनाला नियम करायला जागाच ठेवली नाही, तर खऱ्या अर्थाने सुशासन म्हणजेच रामराज्य येईल !

विवाह जुळवण्यातून फसवणूक !

कालांतराने विवाह जुळवणे, हा पैसा कमावणे, व्यावसायिक, तसेच विज्ञापनाचा भाग बनला. त्यातून वधू-वर सूचक केंद्र, संकेतस्थळ, वर्तमानपत्रांतील विज्ञापन, वधू-वर मेळावे, विवाह जमवणारे दलाल अस्तित्वात आले. यामध्ये काहींचा हेतू वधू अथवा वर यांची, तसेच त्यांच्या नातेवाइकांची फसवणूक करून पळ काढणे असा झाला आहे.

मनोवृत्तीत पालट आवश्यक !

‘सीसीटीव्ही’ बसवल्याने लाच मागण्याचे प्रमाण न्यून होणार नसून मनुष्याच्या मूळ मनोवृत्तीत पालट होणे अत्यंत महत्त्वाचे ! मनोवृत्ती पालटण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत. योग्य संस्कार रुजवण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिल्यास सीसीटीव्ही सारख्या बाह्य गोष्टींची आवश्यकता भासणार नाही !