नवरात्रीचे बाजारीकरण थांबवा !

हे सर्व प्रकार धर्मशिक्षण आणि राष्ट्रप्रेम यांच्या अभावामुळे घडत आहेत. हिंदूंच्या उत्सवांचे पावित्र्य राखण्याचे दायित्व समाजातील प्रत्येक घटकांवर आहे. समाजाने शास्त्र समजून घेऊन नवरात्रीत देवीची उपासना करण्यास प्राधान्य दिल्यास म्हणजेच धर्माचरण केल्यास उत्सवांना परत मूळ स्वरूप प्राप्त होईल !

देवीची कृपा संपादन करूया !

कृतज्ञताभावाने व्यष्टी आणि समष्टी स्तरावर राष्ट्र अन् धर्म यांची सेवा करून आपल्या जन्मदात्या शक्तीला आपण कृतज्ञतारूपी पुष्प अर्पण करूया. छत्रपती शिवरायांनी स्वतःचे आयुष्य जगदंबेसाठी समर्पित केले, तो आदर्श ठेवून आपणही आई जगदंबेची सेवारूपी भक्ती करून नवरात्रीमध्ये तिची कृपा संपादन करूया !

उत्सवांचे महत्त्व समजून घ्या !

नवरात्रोत्सव म्हणजे आपल्यातील श्री दुर्गादेवीची शक्ती जागृत करणे ! देवीची कृपा संपादन करून घेण्यासाठी गरबा खेळणे. गरबा खेळतांना आपण स्वतःला विसरून देवीच्या भजनात रममाण होणे, तिला अनुभवणे ! आपल्यातील शक्तीतत्त्व जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होणे, ही हिंदु संस्कृती आहे.

काळ्या रंगाचे कपडे नकोत !

अन्य कोणतेही रंग एकमेकांत मिसळले जातात; पण काळा रंग कधीच मिसळला जात नाही. काळ्या रंगाला अधिक महत्त्व दिले जाणे, यातून धर्मशिक्षणाविषयीचे अज्ञान दिसून येते. आपण नकारात्मक स्पंदने ग्रहण करायची ? कि सकारात्मक स्पंदने ग्रहण करून आनंदी व्हायचे ? हे प्रत्येकाने ठरवावे.

आवश्यकता आहे सुसंस्कारांची !

सध्याची शिक्षणपद्धत, एकत्र कुटुंबपद्धतीचा अभाव, पाश्चात्त्य विकृतीचा वाढता प्रभाव या गोष्टीही मुले बिघडण्यास कारणीभूत ठरत आहेत. यामुळे मुले भरकटली आहेत. खरेतर या युवाशक्तीच्या बळावरच भारत विश्वशक्ती बनू शकतो.

अवैध ‘होर्डिंग्ज’वर कारवाई अत्यावश्यक !

या समस्येच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाला कठोर कारवाई करावीच लागेल, त्याचसमवेत प्रत्येक शहरातील लोकप्रतिनिधी आणि नेते यांनीही स्वत: पुढाकार घेऊन असे फलक लागणार नाहीत, हे कसोशीने पाळले पाहिजे. असे झाले, तरच ही समस्या काही प्रमाणात सुटेल !

पितृपक्ष : धर्मशास्त्रीय आधार असलेला श्रद्धेचा विषय !

पितृपक्षातील ‘श्राद्ध’ हा धर्मशास्त्रीय आधार असलेला श्रद्धेचा विषय आहे. यासाठी धर्मशिक्षण घेऊन या विधींची अनुभूती घेऊया. जर कुणी विनोद करत असेल, तर त्याचेही प्रबोधन करून धर्मरक्षण करूया !

पितृऋण, कृतज्ञता आणि कर्तव्य !

श्राद्धविधी करतांना आपण मनात ‘पूर्वजांचे आपल्यावर असलेले ऋण, त्याविषयीची कृतज्ञता आणि आपले कर्तव्य’, असा विचार करून ते केले, तर आपल्याकडून ते अधिक मनोभावे आणि श्रद्धेने होतील.

श्री गणेशमूर्ती विसर्जनातील अक्षम्य चुका !

आता काही दिवसांवर नवरात्र आहे. त्यात युवावर्गाचा सहभाग अधिक असतो. गणेशोत्सवात पहायला मिळालेला अयोग्य भाग नवरात्रोत्सवात पहायला मिळू नये आणि उत्सवात धार्मिकता असावी, थिल्लरपणा नकोच, हेच या निमित्ताने सांगणे !

वाहतूक कोंडीची जटील समस्या !

वाहतूक कोंडीचे प्रश्न वेळीच न सोडवण्यासमवेत वाहनांच्या वाढत्या संख्येकडेही लक्ष द्यायला हवे. देशात ४ माणसांच्या कुटुंबामध्ये ८ गाड्या असे चित्र थोड्याफार फरकाने सर्वत्र पहायला मिळते. येथे एका कुटुंबात एवढ्या वाहनांची आवश्यकता आहे का ? याचाही विचार व्हायला हवा.