पितृऋण, कृतज्ञता आणि कर्तव्य !

#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi

धर्मशास्त्रानुसार चालू असलेल्या पितृपक्षात आपल्या पूर्वजांना पुढील गती मिळावी, यासाठी श्राद्धविधी करण्याचे शास्त्र सांगितले आहे. पूर्वजांना गती मिळावी, पूर्वजांच्या त्रासांपासून मुक्तता व्हावी यांसारख्या कारणांसाठी आपण यथाशक्ती हे श्राद्धविधी करतो. हे श्राद्धविधी करतांना आपण मनात ‘पूर्वजांचे आपल्यावर असलेले ऋण, त्याविषयीची कृतज्ञता आणि आपले कर्तव्य’, असा विचार करून ते केले, तर आपल्याकडून ते अधिक मनोभावे आणि श्रद्धेने होतील.

यामध्ये आतापर्यंत आपले पूर्वज सदाचाराने, प्रामाणिकपणे जगले. त्यामुळे त्याचे फळ म्हणून आपलेही आयुष्य सुकर आहे, हे आपण मान्य करायला हवे. यामध्ये अजून काही सूत्रांची भर घालावीशी वाटते. आपण असा विचार कधी केला आहे का की, आज पूर्वजांमुळेच आपण हिंदु म्हणून जगत आहोत, देवतांची पूजा करत आहोत, भारतासारख्या महान देशात अभिमानाने रहात आहोत.

शतकानुशतके देश आणि धर्म यांवर झालेली इस्लामी आक्रमणे, गुलामी राजवट, पारतंत्र्य, धर्मांतर यांसारख्या समस्यांना सामोरे जाऊनही आपला देश आणि धर्म टिकून आहे. याचे एकच महत्त्वाचे कारण म्हणजे तलवारीच्या भयाने किंवा पैशाच्या लोभाने आपल्या पूर्वजांनी धर्म परिवर्तन केले नाही. नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला; कारण देश पारतंत्र्यात असतांना आपल्या पूर्वीच्या ३-४ पिढ्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रार्थनेसारख्या छोट्या-छोट्या कृतींपासून क्रांतीकार्यात सहभागी होण्यापर्यंतची मोठी कृती केली आहे. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. हे आपल्यावर असलेले पितृऋणच आहे. या पितृऋणासाठी सदैव कृतज्ञ राहून श्राद्धादी विधी करून आपले कर्तव्य बजावूया.

आपले आणखी एक कर्तव्य आहे. आजही देश आणि धर्म यांवरील आक्रमणे कायम आहेत. केवळ त्यांचे स्वरूप पालटले आहे. विविध प्रकारचे जिहाद, धर्मांतर यांनी हिंदु धर्म, तर लाचलुचपत, भ्रष्टाचार, बलात्कार, फसवणूक, दंगली आदी समस्यांनी देश पोखरला जात आहे. देश आणि धर्म यांवरील आक्रमणे दूर करण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलणे अन् पुढील पिढीला साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करून देणे, हे आपले कर्तव्य आहे.

– सौ. स्नेहा रूपेश ताम्हनकर, रत्नागिरी