वृत्तांकनातील अतिशयोक्ती टाळा !

आपले दायित्व काय आहे ? आणि आपण लोकांना काय सांगत आहोत ? याचा विचार करायला हवा. मथळ्यांमधील अतिशयोक्ती किंवा अतीरंजितपणा टाळणे आवश्यक आहे. मथळा, वृत्त आणि छायाचित्र हे सर्व एकच असायला हवे, हेही माध्यमे अन् सामाजिक संकेतस्थळे यांवर वृत्ते देणार्‍यांना समजू नये, हे आश्चर्यजनक आहे.

रस्त्यांची दुरवस्था !

काम चालू असतांना रस्त्याची पहाणी, काम केल्यानंतर पुढील काही वर्षे पुन्हा दुरुस्ती निघणार नाही, याविषयीची लेखी हमी घेणे आदी गोष्टी करायला हव्यात. एवढ्यावरच न थांबता निकृष्ट दर्जाचा रस्ता होण्यास उत्तरदायी असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करायला हवी.

‘कास महोत्सव’ : कारवाई कुणावर ?

नैसर्गिक सुबत्ता राखून ठेवल्यामुळे कास पुष्पपठार जागतिक वारसास्थळ आहे; मात्र अशा महोत्सवांमुळे जिल्ह्यातील नैसर्गिक ठेव्याची विल्हेवाट लागणार असेल, तर याला उत्तरदायी असणारे सर्वच जण कठोर शिक्षेस पात्र आहेत, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ते काय ?

चित्ता, बिबटे आणि गोवंश !

चित्त्याच्या साहाय्याने पर्यटन वृद्धीचा विचार होतांना देशी गोवंशियांच्या संवर्धनाचा विचार आवश्यक आहे. चित्ता, बिबटे आदींची उपयुक्तता पर्यटनाच्या दृष्टीने, तर देशी गोवंशियांची उपयुक्तता आरोग्य आणि अर्थकारणाच्या दृष्टीनेही आहे, हे नक्की !

स्मारकासमवेत विचारांचे आचरण हवे !

स्मारक हे त्या व्यक्तीचे विचार सतत स्मरणात राहून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आपण बांधतो. प्रत्यक्षात ‘हा हेतू साध्य होतांना दिसत नाही’, असे खेदाने म्हणावे लागत आहे. सध्या केवळ महापुरुषांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्यांचे स्मरण केले जाते, असेच आहे.

‘शालेय पोषण आहार योजने’चे तीन तेरा !

योजना कार्यान्वित होण्यासाठी पैसे आणि राबवणार्‍यांची इच्छाशक्ती या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तसेच योजना कार्यवाहीत आणतांनाच या सर्व गोष्टींचा विचार केल्यास नंतर अडचणी येणार नाहीत. हिंदु राष्ट्रामध्ये असा ढिसाळ प्रशासकीय कारभार नसेल !

निगरगट्ट प्रशासन !

एखाद्या सुविधेसाठी ४० वर्षांपूर्वी ना हरकत मिळालेली असूनही त्यादृष्टीने काहीच कृती झाली नाही आणि यामुळे कुणाचा तरी जीव जातो, हे अतिशय संतापजनक आहे !

कृतघ्नपणा !

विदेशात रहाणार्‍या भारतीय लोकांवर तेथील लोक द्वेषमूलक टीका करत आहेत  त्यांना ‘परत भारतात जा’, असे सांगत आहेत. यात दोष कुणाचा आहे ? स्वतःचा अपमान करून घ्यायला आपण इतर देशात का जातो ? आणि नंतर आपण साहाय्यासाठी भारत सरकारकडून अपेक्षा करतो !

संतपिठांची आवश्यकता !

भारतियांनाही निधर्मीपणाच्या मागे न लागता आध्यात्मिक सामर्थ्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतःचे जीवन आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी स्वतःच धर्मशिक्षण घेऊन ते आचरणात आणणे आवश्यक आहे ! भारताला आध्यात्मिक वारसा आहे. संतपिठांच्या माध्यमातून तो पुढेही जपला जाईल, हे नक्की !

‘वन्दे मातरम् !’

सांस्कृतिक आक्रमण मोडून काढण्यासाठी केवळ शासकीय कर्मचार्‍यांनीच नाही, तर सामान्य नागरिकांनीही एकमेकांशी बोलतांना ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अत्यावश्यक आहे ! हे म्हणणे इतके मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे की, त्याचे चळवळीत रूपांतर होऊन हिंदुद्रोह्यांना धडकी भरली पाहिजे !