पुणे येथे कोरोनाच्या काळात ४० सहस्रांहून अधिक विवाह लांबणीवर

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेली दळणवळण बंदी आणि नंतरच्या टप्प्यांवरील कडक निर्बंध यांमुळे गेल्या सव्वा वर्षात अनुमाने ४० सहस्रांहून अधिक विवाह लांबणीवर पडले आहेत. पुणे शहरामध्ये २५० मंगल कार्यालये, १५० ‘लॉन्स’, २७५ ‘बँक्वेट हॉल’ आणि ‘क्लब हाऊस’ मिळून ९०० ठिकाणी विवाह समारंभ होतात. विवाह समारंभास असणार्‍या ५० जणांच्या उपस्थितीच्या बंधनामुळे अनेकांनी विवाह समारंभ स्थगित केले असल्याची माहिती महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिली. सध्याच्या काळात  मेहंदी आणि संगीत कार्यक्रमांवरही मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो; मात्र गेल्या सव्वा वर्षापासून हे व्यवसायही ठप्प असल्याचे त्यांनी सांगितले.