Loksabha Elections 2024 : मतांसाठी धर्माच्या आधारे भेदभाव करू नये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

गोव्यात धर्माच्या आधारावर राजकारण का केले जात आहे ? गोवा सरकारमध्ये अल्पसंख्य मंत्री आणि आमदार आहेत. धर्म आणि राजकारण हे एकमेकांत मिसळू नये. मतांसाठी धर्माच्या आधारावर भेदभाव करू नये.

सिंधुदुर्ग : पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना ५ मास वेतन नाही

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आणि रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या भोंगळ कारभारामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी या प्रश्नी कामगार न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली आहे.

पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याकडून तृतीयपंथीय सुरक्षारक्षकांना मारहाण !

पूर्वीही मारहाण केली म्हणून केले होते निलंबित !

मोरगाव (बारामती) येथील ‘महावितरण’च्या महिला कर्मचार्‍याची कोयत्याने १६ वार करून हत्या !

सरकारी कार्यालयात उघड उघड कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा !

पुण्यातील ज्‍योतिषाचार्य अतुल छाजेड अंनिसचे आव्हान स्वीकारण्यास सज्ज !

कुणी आव्हाने स्वीकारली की, शेपूट घालून पळणारी अंनिस याही वेळी वेगळे काही करणार नाही !

Loksabha Elections 2024 : नौदलाच्या कॅप्टनने राज्यघटनेच्या विरोधात बोलणे दुर्दैवी ! – राकेश अग्रवाल, माजी नौदल अधिकारी

नौदलात कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या विरियातो फर्नांडिस (काँग्रेसचे उमेदवार) यांनी राज्यघटनेच्या विरोधात बोलणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे, हे देशासाठी घातक आहे !

पुणे येथील पंतप्रधान मोदी यांची सभा ‘रेस कोर्स’ मैदानावर !

पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या ४ लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी ही सभा आयोजित केली आहे. सभेला येणार्‍या गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभास्थळामध्ये पालट करण्यात आलेला आहे.

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ २७ एप्रिलला पंतप्रधानांची कोल्हापुरात जाहीर सभा ! – राजेश क्षीरसागर

या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील इतर मंत्री उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे २७ एप्रिलला कोल्हापुरात महायुतीचे भगवे वादळ घोंगावणार आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ २४ एप्रिल या दिवशी गणपति मंदिराजवळ आयोजित केलेल्या ‘नमो संवाद’ कोपरा सभेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातून १९ जण हद्दपार !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज प्रांताधिकार्‍यांनी सांगली येथील १९ जणांना महापालिका क्षेत्रातून १० दिवसांसाठी हद्दपार केले आहे.