सातारा जिल्ह्यात बेरोजगारी आणि गरिबीतून ३ युवकांची आत्महत्या !

परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आत्मबळ आवश्यक आहे. आत्मबळ साधनेनेच निर्माण होते. धर्मशिक्षणामुळे साधनेचे महत्त्व मनावर बिंबते. शासनाने आता तरी शालेय शिक्षणामध्ये धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करावा, ही अपेक्षा आहे.

संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवासाठी २९ मार्चला देहू (जिल्हा पुणे) येथे उपस्थित रहावे !

कोरोनाच्या नावाखाली सरकार सर्रास तीर्थक्षेत्रांवरील यात्रा आणि सांप्रदायिक सप्ताह बंद करत आहे, हे अयोग्य !

नरवणे (जिल्हा सातारा) येथे वाळू उपशाच्या वादातून २ चुलत भावांचा मृत्यू !

वाळू उपशाच्या कारणावरून माण तालुक्यातील नरवणे गावातील २ चुलत भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये वाद झाले. या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये २ चुलत भावांचा मृत्यू झाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावामध्ये ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांचा उल्लेख टाळू नका !

दैनंदिन व्यवहार, फलक, तसेच पोर्टलवर ‘श्री सिद्धेश्‍वर’ हा उल्लेख करण्यासमवेतच बाजार समितीचे रजिस्टर, पावती पुस्तके, व्यापार्‍यांना देण्यात येणारे परवाने आदींवरही ‘श्री सिद्धेश्‍वर’ या नावाचा उल्लेख असायला हवा, असे निवेदनात म्हटले आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे आयुक्त

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

होळी आणि रंगपंचमी या उत्सवांमध्ये होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्गातील पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सिंधुदुर्गात शिमगोत्सवासाठी येणार्‍यांना कोरोनाविषयीची चाचणी करणे बंधनकारक

जिल्ह्याच्या बाहेरून येतांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे शक्य न झाल्यास नागरिकांनी जिल्ह्यात येताच त्याच दिवशी संबंधित गावातील जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे घशातील स्रावाची तपासणी (स्वॅब टेस्ट) करून घ्यावी.

थकीत वीजदेयके टप्प्याटप्प्याने भरण्यास सवलत द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ ! – उदयनराजे भोसले

थकबाकीमुळे वीजजोडणी तोडण्याची कारवाई होणार असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. अशा वेळी आम्ही ग्राहकांच्या बाजूने ठामपणे उभे राहू,असेही ते पुढे म्हणाले

पांडे-खानापूर (जिल्हा सातारा) सीमेलगत शेतात टाकलेल्या मळीने विहिरीचे पाणी होणार दूषित

पांडे-खानापूर सीमेलगत दिलीप नथुराम चव्हाण यांच्या मालकीची शेतभूमी आहे. त्यांच्या शेजारी संतोष घाटे यांची शेतभूमी आहे. घाटे यांनी शेतात १० ते १२ ट्रॅक्टर मळी टाकली आहे.

मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहेत. ती समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नियुक्ती केली आहे. येत्या काळात मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन.