कणकवलीत भाजपच्या १९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद, तर कुडाळमध्ये १० कार्यकर्ते पोलीस ठाण्यात उपस्थित

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पुतळा दहन केल्याचे प्रकरण

आडेली येथे कुजलेल्या स्थितीत विवाहितेचा मृतदेह सापडला

विवाहानंतर पती-पत्नींमध्ये मतभेद झाल्याने ४ मासांपूर्वी सौ. जानवी या माहेरी आल्या होत्या.

सिडकोचे १०६ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध

सिडको महामंडळाकडून नवीन पनवेल, खारघर, नेरूळ, घणसोली आणि ऐरोली या विभागात १०६ निवासी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ठिकठिकाणी निवेदने

नांदेड, परभणी, सांगली आणि बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) येथे ‘व्हॅलेंटाईन डे’चे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन

राज्याला १ लाख १४ सहस्र कोटी रुपयांची आर्थिक तूट

कोरोनाच्या संकटासह राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याच्या तिजोरीवर या आर्थिक वर्षात १ लाख १४ सहस्र कोटी रुपयांची आर्थिक तूट आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वित्तीय स्थितीविषयी सादरीकरण करतांना राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिली.

भंडारा येथील तहसीलदार निवृत्ती उइके यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

लाच घेणार्‍या गुन्हेगारांवर प्रशासन आणि पोलीस कठोर कारवाई करत नसल्याने गुन्हेगार समाजात मनमानी पद्धतीने कारभार करतात. भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

महेश इंगळे यांचे कार्य कौतुकास्पद ! – नरेंद्र पाटील

श्री वटवृक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे आध्यात्मिक सेवेचा वसा लाभलेले व्यक्तीमत्त्व आहे. त्यांना मंदिर समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून स्वामी सेवेची संधी लाभली आहे. स्वामी सेवेच्या माध्यमातून महेश इंगळे करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे नरेंद्र पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांचे कारनामे, भानगडी आणि मुजोरीपणा यांमुळे जनता मेटाकुटीस ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

महाराष्ट्रात विकास होईल अशी आशा जनतेला आहे; मात्र विकास करण्याचे दायित्व ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात अथवा कारनाम्यात लिप्त आहेत.

चंद्रपूर येथे पंतप्रधान मोदी यांच्या फलकाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले;  तिघांना अटक

काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या काळात किती महागाई वाढली हे पाहिले आहे का ? काँग्रेसजनांनी केलेल्या कुकृत्याचा पाढा इतका न संपणारा आहे की, त्यांच्या नेत्यांना सततच तोंड काळे करून फिरावे लागेल !

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अपप्रकार होऊ नये म्हणून बजरंग दलाची मिरज शहर आणि ग्रामीण भागात पहारा पथके !

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कार्यकर्ते सातत्याने पहारा देत असल्याने कोणताही अनुचित प्रकार दिसून आला नाही. पोलिसांनीही यंदा शहर परिसर, दंडोबा डोंगर येथे दामिनी पथके सिद्ध ठेवली होती.