पोलिसांनी हिंदु तरुणीला त्वरित शोधून आणावे !

अमरावती येथे आणखी एक ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण, हिंदु तरुणींच्या पालकांची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकार्‍यांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे !

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्रतिदिन १ सहस्र १०० टन कचर्‍याची निर्मिती !

कचरा अल्प करणे आणि कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे यांविषयी नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, तसेच प्रशासनाने ओल्या कचर्‍याचा उपयोग करून नैसर्गिक खते सिद्ध करण्यासाठीही नागरिकांना प्रशिक्षित करणे आवश्यक !

पुणे येथील गणेशोत्सव मंडळात क्रांतीकारकांचे ‘फ्लेक्स प्रदर्शन’ तसेच शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

बावधन, कोथरूड येथे ‘बावधान गणेशोत्सव मंडळा’त १ सप्टेंबर या दिवशी क्रांतीकारकांचे ‘फ्लेक्स प्रदर्शन’ लावण्यात आले होते, तसेच ‘काळानुसार स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता आणि साधनेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान झाले.

बनावट पनीर तयार करणार्‍या कारखान्यावर कारवाई !

नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍या आस्थापनांवर तातडीने कारवाई करून ते बंदच करायला हवेत !

वर्धा येथे मतिमंद युवतीवर अत्याचार, एकाला अटक !

जिल्ह्यातील आष्टी येथे २६ वर्षीय मतिमंद युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अतुल बोरीवार (वय २५ वर्षे) याच्यावर गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला ५ सप्टेंबर या दिवशी अटक केली आहे.

मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघणार ! – न्यायालयाचा निकाल

मानाच्या गणपति विसर्जन मिरवणुकीपूर्वी अन्य मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास अनुमती द्यावी, या मागणीसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे लक्ष्मी रस्ता येथून मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघेल, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

नागपूर येथे मोक्का लावलेल्या बंदीवानाकडे गांजा आणि भ्रमणभाषच्या १५ बॅटर्‍या सापडल्या !

यामध्ये निश्‍चित बंदोबस्तातील पोलीस अथवा बंदीवानाला भेटायला येणारे त्याचे नातेवाईक यांचा सहभाग असू शकतो. कारागृहातील बंदीवानांकडे लक्ष ठेवू न शकणार्‍या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा !

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !

श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर (जिल्हा अमरावती) यांच्या वतीने भव्य संत संमेलन आणि शोभायात्रा !  

श्री रुक्मिणी विदर्भ पीठचे पिठाधिश्‍वर जगदगुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्यजी, समर्थ माऊली सरकार यांनी अमरावती येथे गणेशोत्सवानिमित्त चिंतामणी गणेश मंदिराची स्थापना, गणेश महायाग, तसेच भव्य संत संमेलन आणि शोभायात्रा यांचे आयोजन केले होते.

कोल्हापूर महापालिकेच्या कृतीमुळे हिंदूंच्या देवतेचा अवमान ! – नितेश राणे, आमदार, भाजप

कोल्हापूर महापालिकेने भाविकांकडून विविध कुंडांमध्ये गोळा केलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खणीत विसर्जित करतांना त्या फेकल्याचा ‘व्हिडिओ’ समोर आला आहे. या संदर्भात अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.