दिवसातून २ वेळाच आहार घेऊन कृशता येत असेल, तर आवश्यकतेनुसार तिसरा आहार घ्यावा
आहार न्यून पडल्याने काहींचे वजन अजून न्यून होऊ लागते आणि कृशता येते. असे होऊ लागल्यास आवश्यकतेनुसार तिसरा आहार घ्यावा.
आहार न्यून पडल्याने काहींचे वजन अजून न्यून होऊ लागते आणि कृशता येते. असे होऊ लागल्यास आवश्यकतेनुसार तिसरा आहार घ्यावा.
आपण म्हणत असतो की, प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे खास असे वेगळेपण असते. प्रत्येक व्यक्ती ही इतरांसारखी नसते. प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या असतात.
सकाळी उठल्या उठल्या सुकामेवा, मध इत्यादी खाल्ल्याने जठराग्नी मंद होतो. त्यामुळे आपण नंतर जे काही खातो, ते नीट पचत नाही. यामुळे अनेक विकार निर्माण होतात. यामुळे सकाळी सुकामेवा, मध इत्यादी खाणे टाळावे. हे पदार्थ खायचेच झाले, तर दुपारी जेवणानंतर खावेत.
प्रतिदिन सकाळी चांगली भूक लागल्यावर १ कप गरम दुधात २ चमचे तूप आणि १ चमचा सनातन यष्टीमधु चूर्ण मिसळून प्यावे. याने शरिराचे उत्तम पोषण होते. आठवड्याभरातच लाभ दिसू लागतो. हे औषध नेहमी घेतले, तरी चालते.
आपण जेवढ्या चांगल्या दुधाचे विरजण लावू, तेवढे चांगले तूप आपल्याला मिळते. त्याप्रमाणे आपला आहार चांगला असल्यास आपले धातूही उत्तम निर्माण होतील.
. . . केसतोड किंवा गळू झालेल्या ठिकाणी या कापसाच्या चकतीने शेक देऊन चिंधीच्या साहाय्याने ती चकती केसतोडावर बांधावी. दिवसा बांधलेला कापूस रात्री आणि रात्री बांधलेला दिवसा काढावा (सोडावा) आणि बरे होईपर्यंत पुन्हा याच पद्धतीने बांधावा.
कडूनिंबाची पाने चवीला कडू असतात. कडू चवीच्या पदार्थांमध्ये आकाश आणि वायु ही महाभूते प्रामुख्याने असतात. ही महाभूते कफातील महाभूतांच्या विरुद्ध गुणधर्माची आहेत. कडूनिंबाची चटणी खाल्ल्याने कफाचे विकार नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.
तापामध्ये कफ न वाढवणारा आहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे ताप आलेला असतांना शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी पिणे टाळावे.’
आजकाल बहुतेकांकडून कधीही झोपणे, उठणे, काहीही आणि कधीही खाणे यांसारखे आरोग्यासंबंधीचे बेशिस्त वर्तन होत असते. ‘स्वयंशिस्त’ असेल तर शरिरातील संप्रेरकांचे बिघडलेले चक्र पुन्हा नीट होऊ लागते.