Pramod Muthalik : कर्नाटकात येणार्‍या ‘द्वेषपूर्ण भाषण’विधेयकाला श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांचा विरोध !

  • मुसलमानांचे लांगूलचालन करणारे विधेयक !

  • हिंदूंना लक्ष्य करणारे विधेयक !


मंगळुरू (कर्नाटक) – ‘द्वेषपूर्ण भाषण’ (हेट स्पीच) विधेयकाविषयी श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. ‘हे पद्धतशीरपणे मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी सिद्ध केलेले विधेयक आहे. मुसलमानांच्या दबावाखाली येऊन हे विधेयक संमत केले आहे. या विधेयकात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे’, असे श्री. मुतालिक यांनी म्हटले आहे.

श्री. मुतालिक म्हणाले,

१. मुसलमानांच्या कारवायांकडे आणि त्यांच्या द्वेषपूर्ण भाषणांकडे सरकार लक्षच देत नाही; मात्र हिंदूंना लक्ष्य करण्याचे धोरण काँग्रेसने आजवर पद्धतशीरपणे राबवले आहे. या  विधेयकाच्या माध्यमातून हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

२. मुसलमानांच्या पहाटे ४, ४.३० आणि पहाटे ५ वाजता अजान देतात, प्रार्थना करतात. प्रार्थनेत ‘अल्ला हाच एकमेव देव आहे आणि बाकी कोणीही देव नाही’, असे म्हणणे हा द्वेष नाही का? शुक्रवारी नमाजाच्या वेळी द्वेषपूर्ण भाषणे केली जातात. या विधेयकाद्वारे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार का?

३. आज हिंदु मुलींना पद्धतशीरपणे ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवून बुरखा घालण्यास भाग पाडले जात आहे, गोमांस खायला घातले जात आहे, त्यांना वेश्याव्यवसाय आणि जिहाद यामध्ये ढकलले जात आहे. अशी सहस्रावधी प्रकरणे समोर आली आहेत. त्यांच्या रक्षणासाठी आम्ही जिहाद्यांच्या विरोधात (अन्यायाविरुद्ध) लढा देणे म्हणजे द्वेष आहे का?

४. गोवंश हत्या बंदी कायदा असतांनाही गोहत्या होत आहे, गायींची चोरी होत आहे आणि गोमांसाचा पुरवठा होत आहे. त्याविरुद्ध आम्ही लढा दिला, तर तो द्वेष आहे का? त्याविरुद्ध बोललो तर ते द्वेषपूर्ण भाषण ठरते का?

५. ख्रिस्ती मिशनरी आज उघडपणे गावोगावी जाऊन हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. या धर्मांतराच्या विरोधात हिंदु समाजाला जागृत करणे आणि संघटित करणे हा द्वेष आहे का ? आम्ही समाजाला जागृत करण्याचे काम करत आहोत. हिंदु समाजाचे रक्षण करणे, हे आमचे  दायित्व आहे आणि ती आम्ही पार पाडणारच.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असतांना याहून वेगळे काय होणार ? हिंदूंची गळचेपी करणार्‍या काँग्रेसला हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक !