योगऋषी रामदेवबाबा यांचे मुसलमानांना आवाहन !
मुसलमान धर्मगुरु, राजकीय नेते आणि संघटना यांचा या विधानाला विरोध

नवी देहली – काही लोक म्हणतात, ‘हिंदु राष्ट्र बनले, तर मुसलमान कुठे जाणार ? मी त्यांना सांगेन की, मुसलमानांना त्यांच्या पूर्वजांच्या परंपरा स्वीकाराव्यात. अरे, जो आपल्या बापाचा (पूर्वजांचा) होऊ शकला नाही, तो कुणाचाच होऊ शकत नाही. आपले पूर्वज आणि ऋषी-मुनी यांचे ऐका. तुम्ही दाढी ठेवा, मिशा कापा, कशीही टोपी घाला, कशीही पगडी बांधा, कोणतेही कपडे परिधान करा; पण तुमचे चारित्र्य तुमच्या पूर्वजांसारखेच ठेवा. भारतात मुसलमानांना कोणताही धोका रहाणार नाही, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी देहली विद्यापिठातील एका कार्यक्रमात बोलतांना केले.
आपल्या सर्वांचे पूर्वज सनातनी हिंदु आहेत !
रामदेवबाबा पुढे म्हणाले की, आमच्या हरिद्वारजवळ देवबंद मदरसा आहे, तिथे मला वर्ष २००९ मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. मी त्यांना म्हणालो होतो की, भाऊ आपले धर्म वेगळे असू शकतात; पण पूर्वज तर एकच आहेत. जेव्हा आम्ही प्रवेशद्वारामधून आत आलो, तेव्हा तिथे लिहिले होते आणि इथेही लिहिले आहे की, हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही. आपल्या सर्वांचे पूर्वज सनातनी हिंदु आहेत.
(म्हणे) ‘भारत हिंदु राष्ट्र नाही !’ – नसीम सिद्दीकी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दीकी म्हणाले की, मी या विधानाचा तीव्र निषेध करतो. सर्वांत पहिले म्हणजे, भारत हिंदु राष्ट्र नाही. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, जे सर्व धर्मांचा समान आदर करण्याच्या तत्त्वावर आधारित आहे. प्रत्येकाला धार्मिक परंपरांचे अनुसरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. अशी विधाने देशाची एकता आणि अखंडता यांसाठी गंभीर धोका निर्माण करतात.
(म्हणे) ‘कदाचित् रामदेवबाबा स्वतःच घाबरले आहेत !’- जमियत उलेमा-ए-हिंद
जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना सिराज खान म्हणाले की, कोण घाबरले आहे ? कुणाला भीती वाटत आहे ? कदाचित् रामदेवबाबा स्वतःच घाबरलेले आहेत. हा देश राज्यघटनेने चालेल. (उद्या राज्यघटनेत लोकशाही मार्गाने पालट करून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ लिहिल्यानंतर हेच मुसलमान त्याचे पालन करणार आहेत का ? राज्यघटनेच्या नावाखाली हवे ते करण्याचे स्वातंत्र्य ते आतापर्यंत घेतच आले आहेत. ते कधी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांकांवर तेथील मुसलमानांकडून केल्या जाणार्या अत्याचारांवर का बोलत नाहीत ? – संपादक) कुणालाही याविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही. मुळात अशी विधाने करणारे ते कोण आहेत ? त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
धर्माच्या आधारावर होणार्या भेदभावाचा विरोध केला आहे ! – मौलाना खालिद रशीद फिरंगी महली
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ईदगाहचे (नमाजपठणाची जागा) इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी सांगितले की, मुसलमान कधीही डगमगत नाहीत किंवा घाबरत नाहीत; कारण ते अल्लाची प्रार्थना करतात आणि खरे तर सर्व मानवांचे पूर्वज एकच आहेत. आम्ही नेहमीच धर्माच्या आधारावर होणार्या भेदभावाचा विरोध केला आहे. उत्तराखंडमध्ये मशिदी पाडल्या जाण्यामुळे आणि मदरसा बोर्ड रहित केल्यामुळे मुसलमानांना प्रचंड त्रास आणि वेदना होत आहेत. (बेकायदेशीर गोष्टी पाडल्यामुळे मुसलमानांना त्रास का होत आहे ? ते राज्यघटनेला मानत नाहीत का ? – संपादक)
(म्हणे) ‘आमचा विचार तोच आहे जो राज्यघटना सांगते !’ – काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद म्हणाले की, जर प्रत्येक जण सनातनीच होता, तर मग इथे अशा प्रकारे दरी निर्माण करण्याचे प्रयत्न का केले जात आहेत ? मी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीखेरीज इतर कोणत्याही विचाराशी सहमत नाही. आमचा विचार तोच आहे जो राज्यघटना सांगते. आमचा तिच्यावर विश्वास आहे आणि पूर्ण देश यावर विश्वास ठेवतो; यामध्ये सर्व लोकांची श्रद्धा सामावलेली आहे. (सोयीनुसार राज्यघटनेचे समर्थन करणारे ढोंगी मुसलमान ! – संपादक)
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती