कर्नाटकातील व्यायामशाळेचा मालक इस्माईल याने हिंदु तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण

दावणगेरे (कर्नाटक) – शहरातील हिंदु तरुणी आणि महिला यांना लक्ष्य करून लैंगिक अत्याचार करणार्या आणि त्यांचे व्हिडिओ बनवून धमकावून पैसे उकळणार्या ‘पॉवर फिटनेस जिम’ या व्यायामशाळेचा मालक आणि प्रशिक्षक इस्माईल याला मुसलमान समाजाच्या नेत्यांनी तातडीने समाजातून बहिष्कृत करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजशेखर एन्. नागप्पा यांनी केली आहे. इस्माईलसारख्या व्यक्तीमुळे सामाजिक स्वास्थ्य आणि धार्मिक सलोखा बिघडण्याची भीती आहे, असे नागप्पा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
श्रीराम सेना आणि हिंदु जागरण वेदिके यांनी संयुक्त कारवाई करून हा ‘जिम जिहाद’ उघडकीस आणला आहे. पोलिसांनी इस्माईलसारख्या गुन्हेगाराला कायद्यानुसार कडक शिक्षा होईल, हे पहावे, असे नागप्पा यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला भाजपचे नेते अनंत नाईक, कोळेनहळ्ळी सतीश, धनंजय कड्लेबाळू, विश्वास एच्.पी. आणि इतर उपस्थित होते.
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी
‘आय.एन्.एस्. महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश !
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !
मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींच्या केलेल्या निर्दाेष मुक्ततेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !
UDISE Plus Report : देशभरात प्रतिदिन सरासरी १३ शाळा होतात बंद !
आधी ‘वन्दे मातरम्’ नंतर ‘जन गण मन’ गायले किंवा लावले जाईल ! – केंद्रशासनाचा आदेश