पाकचे उपपंतप्रधान इशाक डार यांचे विधान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर पाकिस्तानला अतोनात हानीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या ४ वर्षांत पाकिस्तानात ४ सहस्र सैनिक मारले गेले आहेत, तर २० सहस्रांहून अधिक घायाळ झाले आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानविरुद्ध होऊ नये, हे पाकिस्तानचे धोरण आहे. यासाठी तालिबानशी सातत्याने चर्चा केली; परंतु अद्याप सकारात्मक परिणाम मिळालेले नाहीत, असे विधान पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी केले. त्यांनी तालिबानला आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.
🔥 Taliban terrorists have killed 4,000 Pakistani soldiers in 4 years! – Pak Deputy PM Ishaq Dar
For a country that has sponsored terror in India and caused the deaths of thousands of our citizens, losing 4,000 soldiers to the Taliban is hardly shocking.
🏚️💥 They set fire to… pic.twitter.com/pbCI2SAaiX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 30, 2025
१. डार पुढे म्हणाले की, आम्हाला अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा बंद केल्याचा आनंद नाही; पण हे सुरक्षेच्या कारणांमुळे केले आहे. तालिबानचे बहुतेक सदस्य शांतता इच्छितात, पण काही जणांना हे मान्य नाही. अलीकडेच तालिबान सरकारने माहिती दिली आहे की, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या शेकडो आतंकवाद्यांना कह्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा :
♦ तालिबानकडून खैबर पख्तूनख्वा प्रांतातील ‘इस्लामिक स्टेट’च्या तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण !
♦ पाकच्या अफगाणिस्तानवरील हवाई आक्रमणात १० नागरिकांचा मृत्यू
२. डार यांनी सांगितले की, पाकचे सैन्य गाझामध्ये आंतरराष्ट्रीय दलाला साहाय्य मदत करण्यास सिद्ध आहे. तथापि, यासाठी आधी भूमिका, नियम आणि अधिकार स्पष्ट असावेत. हमासला शस्त्रांपासून वेगळे करणे हे पॅलेस्टिनी कायद्याचे काम आहे, पाकिस्तान आणि इतर देशांनी यात हस्तक्षेप करू नये.
संपादकीय भूमिका
|
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan