हिंदु जनजागृती समितीची ‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सानिध्यात’ मोहीम

रत्नागिरी, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – कालमाहात्म्यानुसार हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे, असे संत सांगत आहेत; मात्र या कार्यात धर्मप्रेमी युवकांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे साधना म्हणून सहभागी झाल्यास स्वतःचे जीवन सार्थकी लागेल, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील सहभागाचा आपल्याला आनंदही घेता येईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद भारद्वाज यांनी केले.

‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सानिध्यात’ या हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमेला रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि देवरुख येथील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही मोहीम रत्नदुर्गावर २३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता चालू झाली. या मोहिमेत ८० धर्मप्रेमी सहभागी झाले.
रत्नदुर्गाच्या महाद्वाराजवळील हनुमंताचे दर्शन आणि नामजप करून या मोहिमेला प्रारंभ झाला. मोहिमेत गडाची स्वच्छता करण्यात आली. नंतर सर्वांनी गडाची पहाणी केली.

शौर्य प्रशिक्षण घेतल्यानंतर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आपण कसे प्रयत्न करू शकतो ? तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे आघात अन् त्यावरील उपाययोजना याविषयी श्री. गोविंद भारद्वाज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या वेळी ते बोलत होते.

या मोहिमेत स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गातील युवा आणि समितीच्या कार्यात सहभागी असणारे धर्मप्रेमी, तसेच गड-किल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी विभाग संपर्कप्रमुख तन्मय जाधव, शिवनिष्ठा प्रतिष्ठान, कोल्हापूर विभागाचे कार्यकर्ते पाचल येथील श्री. प्रभाकर सुतार आणि पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे येथील श्री. सतीश कुंभोजकर सहभागी झाले होते.
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन