सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !

श्री. आर्. उमापती

१. साधना करण्यापूर्वी शारीरिक आणि मानसिक त्रासांमुळे मनात आत्महत्या करण्याचे विचार येणे

‘मला वयाच्या दहाव्या वर्षापासूनच गंभीर आजारपणाचा सामना करावा लागत होता. या काळात मला कोणतेही कार्य किंवा प्रगती करणे शक्य होत नव्हते. मी व्याधीमुक्त होण्यासाठी पुष्कळ पैसा व्यय झाला, तरीही त्याचा काही परिणाम झाला नाही. माझ्या जीवनात आनंद आणि शांतता पूर्णपणे लोप पावले होते. मला समाधान लाभत नव्हते. माझ्या मनात अनेक वेळा आत्महत्येचे विचार येत असत.

२. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करणे

अ. वर्ष २०१८ मध्ये नेलमंगला येथे मला सनातनच्या साधकांकडून धर्मशिक्षण मिळाले; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आरंभी माझ्याकडून नीट साधना होत नव्हती. माझ्याकडून थोडीफार सेवा होत होती. त्यानंतर मला मंगळुरू येथील शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. तेथे संतांचे मार्गदर्शन ऐकत असतांना मला अनुभूती आली आणि माझ्या मनात सेवा करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली.

आ. कुणीगल येथील साधक अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा करत होते. त्यांच्या सहवासात गुरूंच्या कृपेने मी नामजपादी उपाय, प्रार्थना, मानसपूजा, भावजागृतीचे प्रयोग करणे, असे काही प्रमाणात करू लागलो.

इ. माझ्याकडून अर्पण देणे आणि मिळवणे, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवा करणे, धर्मशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी होणे, अशा सेवा होऊ लागल्या.

३. व्यष्टी आणि समष्टी साधना केल्यामुळे शारीरिक अन् मानसिक त्रास दूर होणे

मला साधनेमुळे मानसिक शक्ती आणि चैतन्य मिळू लागले. माझे शारीरिक आणि मानसिक त्रास हळूहळू न्यून झाले. आधुनिक वैद्य माझ्या त्रासांवर ३५ वर्षांपासून योग्य प्रकारे उपचार करू शकले नाहीत; मात्र साधनेमुळे केवळ ३ वर्षांत पैसे व्यय न करता मी बरा झालो.

४. मी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर मला जीवनाचे ध्येय गवसले. ‘आपला भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घडवणे’, हे ते ध्येय आहे.

मला या अनुभूती दिल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सर्व संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. आर्. उमापती, कुणीगल, जिल्हा तुमकूरु, कर्नाटक. (९.७.२०२४)                 ॐ

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक