
१. देवासुर संग्रामाचा परिणाम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांवर होणे
‘पूर्वी देवासुर संग्राम शक्तीच्या स्तरावर होत होता. देवी या शक्तीस्वरूपिणी असल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवींच्या चित्रांमध्ये अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येत होते. आता देवासुर संग्राम चैतन्याच्या स्तरावर होत आहे. देव हे चैतन्यस्वरूप असल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येत आहे.
२. काळानुसार कर्मकांडांतर्गत देवींची आणि उपासनाकांडांर्तगत देवांची उपासना अधिक प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांवर होणे

सध्या रामराज्याच्या स्थापनेतील विविध अडथळे दूर होण्यासाठी सप्तर्षी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे विविध प्रकारच्या ‘दशमहाविद्या आणि देवी’ यांचे यज्ञयाग करण्याविषयी सांगितले जाते. त्यानुसार यज्ञयागाला सनातन संस्थेतील मोक्षगुरु श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि मोक्षगुरु श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभते. यज्ञयागाचा परिणाम सगुण स्तरावर अधिक प्रमाणात होऊन सनातनच्या साधकांना होणारे विविध प्रकारचे शारीरिक त्रास न्यून होत आहेत. सध्या संपूर्ण विश्वात रामराज्याच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर होण्यासाठी ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा नामजप सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ‘श्रीराम जय राम जय जय राम । ’ हा नामजप अधिकाधिक करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सध्या सनातन संस्थेतील साधकांकडून देवीची उपासना कर्मकांडानुसार आणि देवांची उपासना उपासनाकांडानुसार चालू आहे. कर्मकांडापेक्षा उपासनाकांड अधिक सूक्ष्म असल्यामुळे त्याचे परिणाम देवीपेक्षा देवांच्या चित्रांवर अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ईश्वरी चैतन्य देवीच्या चित्रांपेक्षा देवांच्या चित्रांतून अधिक प्रमाणात प्रगट झाल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येत आहे.
‘देव आणि देवी यांचे काळानुसार समष्टीच्या कल्याणाचे कार्य कसे चालू असते’, याची प्रचीती वरील सूत्रांवरून येते.’
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखनाचा दिनांक : २०.५.२०२६ आणि वेळ : सायंकाळी ५.२० ते ५.३५)
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद