उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार जियाउर्रहमान बर्क यांचा ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध

नवी देहली – उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार जियाउर्रहमान बर्क यांनी ‘मी ‘वन्दे मातरम्’ गात नाहीत; कारण ते इस्लाम धर्माच्या विरोधात आहे. इस्लाममध्ये केवळ एकाच ईश्वराची उपासना करण्याची अनुमती आहे, त्यामुळे इतर कोणत्याही प्रतीकासमोर नतमस्तक होता येत नाही’, असे म्हटले आहे.
🚨 SP MP Refuses To Say “Vande Mataram”
Samajwadi Party’s Ziaur Rahman Barq from UP claims “Islam allows worship of only one God.”
Even his family has opposed “Vande Mataram”; his grandfather had walked out of the Assembly during its rendition!
Nationalists now ask – should… pic.twitter.com/cgJnx4LQ1j
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 11, 2025
बर्क यांनी पुढे म्हटले की,
‘वन्दे मातरम्’ न गाण्याचा हा विचार केवळ वैयक्तिक नाही, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाचा तोच दृष्टीकोन आहे. माझे आजोबाही या गीताचा नेहमीच विरोध करत आले होते. राज्यात बहुजन समाज पक्षाच्या सरकारच्या काळात आजोबा शफीकुर्रहमान विधानसभा अधिवेशनात ‘वन्दे मातरम्’ वाजताच सभागृहातून बाहेर पडले होते.
सर्वोच्च न्यायालयाचा दाखला
खासदार बर्क यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत म्हटले की, कुणालाही ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास किंवा गाण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. त्याच वेळी त्यांनी हेही नमूद केले की, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांमध्ये भेद आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रगानाच्या शब्दांमध्ये काहीही आक्षेपार्ह नाही; म्हणून ते शाळा आणि मदरसे यांमध्ये गायले जाते.
संपादकीय भूमिकासमाजवादी पक्ष ‘इस्लामवादी पक्ष’ असल्याने त्याच्या प्रमुखापासून सर्व जण ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध करत आले आहेत. अशा पक्षांवर बंदी घालणारा कायदा करणेच आता आवश्यक ठरले आहे ! |
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !