
चेन्नई (तमिळनाडू) – अयोध्या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल घोषित झाल्यानंतर देशात कुठलीही अस्थिरता निर्माण झाली नाही; कारण तो सर्वांना स्वीकारार्ह होता, असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एल्. नागेश्वर राव यांनी येथे सांगितले. चेन्नई येथे आयोजित ‘केस फॉर राम : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मशीद डिस्प्युट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. हे पुस्तक अनिरुद्ध शर्मा आणि श्रीधर पोतराजू यांनी लिहिले आहे.

न्यायमूर्ती राव म्हणाले की, हा भारतातील सर्वांत महत्त्वाचा खटला होता. संपूर्ण देश श्वास रोखून निकालाची वाट पहात होता. लोकांना निकालात काय होईल ? याची नव्हे, तर निकालानंतर काय घडेल ? याची अधिक चिंता होती; परंतु निकालानंतर कुठेही हिंसा झाली नाही. सर्वांनी तो निर्णय स्वीकारला. ही भारतीय समाजाची परिपक्वता दर्शवते, असे न्यायमूर्ती म्हणाले.
⚖️ “Ayodhya Judgment was accepted by all – that’s why there was no breach of peace,” said Justice Nageswara Rao.
📖 At the launch of “Case for Ram: The Untold Story of Ayodhya Ram Janmabhoomi–Babri Masjid Dispute”, he praised the judges’ tireless efforts in delivering the… pic.twitter.com/4SQvWn4QQh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 22, 2025

न्यायमूर्ती राव यांनी या वेळी बोलतांना वरिष्ठ अधिवक्ता के. परासरन् यांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘अधिवक्ता परासरन् म्हणतात की, त्यांनी हा खटला प्रभु श्रीरामासाठी लढला. परासरन् यांनी कधीही विरोधकांविरुद्ध द्वेषभाव दाखवला नाही. त्यांनी विरोधी बाजूच्या अधिवक्त्यांनाही तितकाच सन्मान दिला. न्यायालयाबाहेर वैरभाव न ठेवणे, ही सनातन धर्माची सुंदर परंपरा आहे.’’ ‘न्यायाधीश आणि अधिवक्ता यांनी न्यायालयाबाहेर खटल्यांवर बोलणे टाळावे. परासरन् यांनी कधीच माध्यमांना मुलाखत दिली नाही. अधिवक्त्यांनी न्यायालयात बोलावे आणि न्यायाधिशांनी केवळ त्यांच्या निर्णयांद्वारे बोलावे, असेही ते म्हणाले.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक