|

दावणगेरे (कर्नाटक) – येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात पालट करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ठरलेल्या मार्गाऐवजी जुन्याच मार्गाने मिरवणूक काढण्याची संधी द्यावी, अशी स्थानिक आणि गणेश मंडळांच्या तरुणांनी मागणी केली आहे. या कारणामुळे विसर्जनासाठी निघालेली मिरवणूक रस्त्यातच थांबवण्यात आली. मिरवणूक २१ दिवसांचा गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर काढण्यात येणार होती.
दावणगेरेच्या बसवराज पेठेत स्थापन करण्यात आलेली श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असतांना हा वाद चालू झाला. यापूर्वी मिरवणूक ‘मदिना ऑटो स्टँड’ आणि ‘हंसबावी सर्कल’ या मुसलमानबहुल मार्गावरून जात असे; परंतु २ वर्षांपूर्वी याच मार्गावर दगडफेक झाल्यामुळे पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग रहित करून नवीन मार्ग निश्चित केला होता.
⚡ Karnataka shocker! In Davangere, Police banned Ganesh immersion through Muslim-majority areas (Madina Auto Stand & Hansbavi Circle) citing 2-yr-old stone-pelting.
👉 Ganesh Mandals rejected new route, demanded traditional path.
👉 Denied permission → idol’s eyes covered… pic.twitter.com/LsQGRhng3x
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 17, 2025
या वर्षीही पोलिसांनी निश्चित केलेल्या नवीन मार्गानेच मिरवणूक काढण्यास सांगितले; परंतु गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यास विरोध केला. ‘आम्ही प्रतिवर्षी ज्या मार्गाने जातो, त्याच मार्गाने या वर्षीही जाऊ’, असा आग्रह मंडळाने धरला. या प्रसंगी हिंदु महिलांनीही पोलिसांसमोर हिंदूंची जोरदारपणे बाजू मांडली.
हिंदूंनी श्री गणेशमूर्तीच्या डोळ्यावर काळे कापड घालून केला निषेध !
जेव्हा पोलिसांचे मन वळवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले, तेव्हा गणेश मंडळांचे सदस्य आणि स्थानिक हिंदू यांनी राग व्यक्त करण्यासाठी श्री गणेशमूर्तीवर काळे कापड घातले. ‘पोलिसांनी जुन्या मार्गावरून जाण्यास अनुमती दिली नाही, तर आम्ही मिरवणूक काढणार नाही. आम्हाला मदिना ऑटो स्टँड आणि हंसबावी सर्कल यामार्गेच जाण्याची अनुमती द्या’, अशी मागणी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’