|

भटकळ (कर्नाटक) : येथील मुग्दम कॉलनीतील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनावरांची हाडे सापडल्याने स्थानिकांनी आंदोलन चालू केले असून या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. येथील डोंगरावर गेल्या काही दिवसांपासून हाडे आणि रक्ताचे डाग पसरले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या जागेचा वापर अवैधपणे जनावरांच्या हत्येसाठी वारंवार केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
🚨 Bhatkal (Karnataka): Large number of animal remains found in the forest.
Suspicion of illegal animal trade, with Hindu groups alleging rampant cow slaughter.
Were police & administration asleep while such mass killings took place?🔍#CrimeNews #SaveCows pic.twitter.com/HUPgIl42oX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 14, 2025
या घटनेची माहिती मिळताच हिंदु संघटनांचे सदस्य आणि समाजातील नेते घटनास्थळी पोचले. नंतर महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी ही हाडे गोळा करून त्यांची विल्हेवाट लावली, असा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात सापडलेले हे अवशेष पहाता जनावरांची हत्या करणार्या संघटित टोळीचा यात सहभाग असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
१. या भागात आवाज न करता होत असलेली जनावरांची हत्या तात्काळ थांबवण्याची मागणी हिंदु संघटनांनी केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी कारवाई करून काही लोकांना अटक केली आणि नाकेबंदी केली असली, तरी जनावरांचा पुरवठा अन् त्यांची हत्या अजूनही चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

२. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या भागात अवैधपणे गोमांस तस्करी होत असल्याचा अहवाल दिला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कन्नड आणि उडुपी या शेजारच्या जिल्ह्यांत, तसेच गोवा राज्यात गोमांस वाहून नेणार्या वाहनांचा हिंदु कार्यकर्त्यांनी अनेकदा पाठलाग केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये महागड्या गाड्यांमधून गोमांस वाहून नेले जात असल्याचाही त्यांचा दावा आहे.
३. या घटनेमुळे भटकळ आणि आसपासच्या परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून गोहत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही (अंमलबजावणी) करण्याची आणि पोलीस प्रशासनाने सतर्क रहाण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी लवकरच स्थानिक नेते जिल्हाधिकार्यांची भेट घेणार आहेत.
४. या प्रकरणाविषयी प्रतिक्रिया देतांना हिंदु जनजागृती समितीचे बंगळुरू येथील प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी म्हटले की, स्थानिक आमदार आणि प्रशासन या अवैध कामांकडे डोळेझाक कसे करू शकतात ? कर्नाटकात गोहत्याबंदी कायदा अजूनही लागू आहे. पोलीस, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नागरी संस्था यांनी या प्रकरणी कारवाई करणे आवश्यक आहे.
🚨 Horrific incident from #Bhatkal, Uttara Kannada 🚨
Hundreds of cattle bones & skeletons found in bhatkal forest area.
⚠️ Locals suspect ongoing large-scale slaughter.
⚠️ Within hours, JCB machines used to cover up evidence!Hindu orgs demand serious probe & strict action. 🚩 pic.twitter.com/BsuaF1gxFQ
— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@MohanGowda_HJS) September 13, 2025
ही घटना जनावरांचा अवैध व्यापार करणार्या मोठ्या टोळीचा भाग आहे का ?, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. जिल्हा प्रशासनाने अद्याप या प्रकरणाविषयी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
संपादकीय भूमिकाजनावरांचा मोठ्या प्रमाणात हत्या होत असतांना पोलीस आणि प्रशासन झोपा काढत होते का ? |
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक