|

दावणगेरे (कर्नाटक) – शहरातील मट्टीकल्लू येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने अफझलखान वधाचे फलक लावण्यात आले होते. यातून तणाव निर्माण होत असल्याचे कारण देऊन पोलिसांनी हिंदूंना ते काढण्याची २९ ऑगस्टच्या सकाळी १०.३० पर्यंतची मुदत दिली; परंतु त्याआधीच रात्री दीड वाजता पोलिसांनी स्वत:च ते हटवल्याचे समोर आले. यास स्थानिक हिंदूंनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
हिंदुत्वनिष्ठ तरुणांनी ‘समाजाला सत्य इतिहास समजावा’, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा वध करत असल्याचे चित्र लावले होते; परंतु पोलिसांनी त्यास विरोध दर्शवून ‘यामुळे समाजात तेढ निर्माण होईल’, असा आरोप केला. पोलिसांनी ते फलक काढण्याचा प्रयत्न केला असता हिंदु तरुणांनी त्यास तीव्र विरोध दर्शवला. यावरून पोलिसांनी त्यांना फलक काढण्याची मुदत देऊन तोपर्यंत फलक काढून घेण्यास सांगितले होते; परंतु आदल्या रात्रीच ते फलक पोलिसांनी स्वत:च काढून नेले.
शेवटची माहिती हाती आली, तेव्हा स्थानिक हिंदुत्वनिष्ठ नेते आणि कार्यकर्ते २९ ऑगस्टला एकत्र येऊन बैठक घेणार होते.
संपादकीय भूमिका
|
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !