(एन्.सी.ई.आर्.टी. : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)
नवी देहली – एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता ८ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात मोगलांच्या क्रौर्याचा इतिहास अंतर्भूत करण्यात आला असतांनाच मराठा आणि शीख राजांचीही माहिती विस्तृतपणे देण्यात आली आहे. ‘एक्सप्लोरिंग सोसायटी – इंडिया अँड बियॉन्ड’ या ८ वीच्या पुस्तकात शीख आणि मराठा इतिहासाशी संबंधित गोष्टी पूर्वीही होत्या; परंतु आता त्यात तपशीलवार प्रकरणे समाविष्ट करण्यात आली आहेत. ही नवीन पुस्तके शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाणार आहेत.
Swaraj Returns to the Syllabus! 📖🔥 NCERT Honors Chhatrapati Shivaji Maharaj
🚩 8th Std Sociology books now include:
🔸 22 pages on Maratha History
🔸 Sikh Empire – Guru Nanak's journey ➕ Guru Gobind Singh’s Khalsa ➕ Guru Tegh Bahadur’s martyrdom
🔸 Rani Abbakka, Martanda… pic.twitter.com/RevTKMq6ba
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 18, 2025
१. या नवीन पुस्तकांमध्ये ओडिशाचे गजपती शासक नरसिंहदेव, राणी अब्बक्का, तसेच त्रावणकोरच्या मार्तंड वर्मा यांच्यावरील धड्यांचा समावेश आहे.
२. गुरु नानक यांच्या आध्यात्मिक प्रवासावर आणि गुरु गोविंद सिंह यांच्या सैनिकी प्रतिकारावर पुस्तकात प्रकरणे जोडण्यात आली आहेत. त्यात खालसा पंथाचा पाया कसा रचला गेला ?, हे सांगितले आहे. गुरु तेग बहादूर यांना झालेल्या फाशीची माहितीही जोडण्यात आली आहे. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत शीख साम्राज्य ब्रिटीश राजवटीविरुद्ध कसे ठामपणे उभे राहिले?, हेही यात सांगितले आहे.
मराठ्यांच्या इतिहासासाठी आता २२ पाने !
आतापर्यंत ८ वीच्या पुस्तकात मराठ्यांविषयी केवळ दीड पान होते. आता या अभ्यासक्रमात २२ पानांचा दीर्घ इतिहास जोडण्यात आला आहे. त्यात १७ व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय, रायगडावरील त्यांचा राज्याभिषेक, त्यांची गनिमी शैली, शिवाजी महाराजांची सैनिकी रणनीती, प्रशासन आणि स्वराज्यावरील भर यांचा समावेश आहे. शिवाजी महाराजांव्यतिरिक्त त्यांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज, राजाराम, शाहूजी, ताराबाई, तसेच बाजीराव पेशवे पहिले, महादजी शिंदे आणि नाना फडणीस यांच्या कथांचाही समावेश करण्यात आला आहे. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ४ ओळी देण्यात आल्या होत्या.

न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा