काश्मीरमध्ये पुन्हा घुसखोरी करून मोठा घातपात करण्याची शक्यता !

नवी देहली – भारताकडून नुकताच लाजिरवाणा पराभव पत्करावा लागलेला पाकिस्तान त्याच्या भारतविरोधी कारवाया थांबवण्यास सिद्ध नाही. सीमा सुरक्षा दलाच्या मते, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पुन्हा एकदा जिहादी आतंकवादी पाकव्याप्त काश्मीरमधील त्यांच्या तळांवर परतू लागले आहेत, तसेच प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ते जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करून मोठा घातपात करू शकतात, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. यामुळे सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या आहेत, अशी माहिती दलाचे महानिरीक्षक शशांक आनंद यांनी दिली.
🚨Terrorists are returning to their camps near LoC – Jammu BSF IG Shashank Anand
🛑A fresh wave of infiltration in Kashmir could lead to another major terror strike.
👉India’s swift response to the Pahalgam attack, “Operation Sindoor”, wiped out nine terror camps. However… pic.twitter.com/sQRC1FWRaw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 28, 2025
शशांक आनंद म्हणाले की,
१. आम्हाला सतत वेगवेगळ्या प्रकारची गोपनीय माहिती मिळत आहे. तथापि आतंकवादी कधी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील हे अद्याप कळलेले नाही; परंतु सुरक्षादल पूर्णपणे सज्ज आहेत.
२. शशांक आनंद यांनी १० मे या दिवशी पाकिस्तानने केलेल्या दुःसाहसाविषयी सांगितले की, पाकिस्तानने आमच्या चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन पाठवले होते. सैनिक ते ड्रोन पाडण्याचा प्रयत्न करत होते. या वेळी एका ड्रोनने बाँब टाकला, ज्यामध्ये आमचे उपनिरीक्षक महंमद इम्तियाज, शिपाई दीपक कुमार आणि भारतीय सैन्याचे नाईक सुनील कुमार यांचा मृत्यू झाला. सीमा सुरक्षा दलाने त्यांच्या २ चौक्यांना या सैनिकांची नावे देण्याचा आणि सांबा सेक्टरमधील एका चौकीला ‘सिंदूर’ असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
#WATCH | Jammu | BSF IG Jammu Shashank Anand says, "We are getting many inputs regarding terrorists returning to their launchpads & camps and possible infiltration along LoC & IB. Security Forces will have to remain alert." pic.twitter.com/ASd3rauAq4
— ANI (@ANI) May 27, 2025
३. यापूर्वी १३ मे या दिवशी ‘ऑपरेशन केलर’मध्ये भारतीय सैन्याने लष्कर-ए-तोयबाच्या ४ आतंकवाद्यांना ठार मारले होते. आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता.
संपादकीय भूमिका
|
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !