श्री. फ्रान्सिस गोतिए यांचा जन्म पॅरिस येथे झाला आणि त्यांचे संगोपन कडवट अशा कॅथॉलिक कुटुंबामध्ये झाले. ते सध्या पुणे येथे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करतात. त्यांनी अनेक नामांकित फ्रेंच-भाषेच्या दैनिकांसाठी दक्षिण आशियाई वार्ताहर म्हणून काम केले आहे. ‘जीवनात काहीतरी ‘अपूर्ण’ आहे’, या जिज्ञासेच्या माध्यमातून ते ‘हिंदुत्वाशी’ जोडले गेले आणि त्यांनी आध्यात्मिक साधना, तसेच हिंदुत्वाचे कार्य यांना आरंभ केला. काश्मिरी हिंदूंची विदारक स्थिती दर्शवणारे ‘फॅक्ट’ प्रदर्शन, तसेच पुण्यामधील ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ यांचे ते संस्थापक आहेत.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. फ्रान्सिस गोतिए यांचा आध्यात्मिक प्रवास
श्री. फ्रान्सिस गोतिए हे १९ वर्षांचे असतांना त्यांना समजले की, महर्षि अरविंद यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांच्या भक्तांचा समूह हा पॅरिस ते पाँडिचेरी असा प्रवास करणार आहे. तेव्हा ते आध्यात्मिक जिज्ञासेपोटी या प्रवासाचा एक भाग झाले आणि भारतामध्ये आले. भारतात आल्यावर त्यांना ‘आपण स्वतःच्या ‘घरीच’ आलो आहोत’, असे वाटायला लागले. पाँडिचेरी येथील महर्षि अरविंद आश्रमात त्यांनी ७ वर्षे वास्तव्य करून भारतीय संस्कृती, अध्यात्म यांचा अभ्यास केला, साधना केली. त्यांच्या गुरु मां यांचे देहावसान झाल्यानंतर त्यांनी लिखाणाचे, तसेच पत्रकारितेचे काम चालू केले, ज्याचा त्यांना पॅरिसपासूनचा पूर्वानुभव होता.
२. हिंदुत्वाच्या कार्याची प्रेरणा
भारतामध्ये पत्रकारितेच्या कामाचा प्रारंभ त्यांनी केरळमधील ‘कलारीपयट्टू’ प्रथेच्या (स्वसंरक्षणाची एक पद्धत) लघुपटापासून चालू केला. ‘कलारीपयट्टू’ तिसर्या शतकात उगम पावली. विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम हे ‘कलारीपयट्टू’चे संस्थापक आहेत, ज्यांनी ४२ ‘कलारींची’ स्थापना केली आणि केरळच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी या ‘कलारींच्या’ २१ गुरूंना शिकवले. कालांतराने परकियांनी ही कला भारतियांकडून घेतली आणि पुढे चीन, जपान या देशांमध्ये ‘कुंग फु’, ‘शाओलीन बॉक्सिंग’, कराटे या नावाने ती ओळखण्यात येऊ लागली.
हिंदु युवकांना संदेश !

हिंदु युवकांनी भारताचा गौरवशाली आणि प्राचीन इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे अन् त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखाली न येता भारतात राहून देशसेवा करा. जरी इतर देशात सुखसुविधा अधिक असतील, तरी देश सोडू नका आणि वेळप्रसंगी देशासाठी संघर्ष करा. हिंदु धर्म हाच सर्वांसाठी शेवटची आशा आहे; कारण त्यामध्ये दिलेली आध्यात्मिक तत्त्वे, ज्ञान जसे की, मी कोण आहे ? माझ्या जन्माचे ध्येय काय आहे ? मृत्यूनंतरचा प्रवास कसा असतो ? अवतार कोण असतात ? कर्म आणि धर्म म्हणजे काय ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे केवळ हिंदु धर्मातच सापडू शकतात.
तेव्हा त्यांची भेट हिंदु कलारी विद्या शिकवणार्या गुरूंसह झाली आणि त्यांनी अन् त्यांच्या शिष्यांनी श्री. फ्रान्सिस गोतिए यांना कुठलाही संकोच मनात न ठेवता सर्व माहिती दिली. तेव्हा श्री. फ्रान्सिस यांना हिंदु धर्माविषयी श्रद्धा जाणवली आणि या कलेच्या माध्यमातून हिंदु हे स्वसंरक्षण करण्यासाठी समर्थ आहेत, याची जाणीव झाली.
३. दलाई लामा आणि श्री श्री रविशंकर यांचा प्रभाव

हिंदु धर्म, तसेच अध्यात्म याचा अभ्यास करत असतांना ते अनेक धर्मगुरू आणि त्यांच्या शिष्यांना भेटत असतात आणि त्यांच्याकडून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेत असतात. याच गोष्टी त्यांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात प्रेरणा देतात. महर्षि अरविंद यांच्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून त्यांना पत्रकारितेचे दृष्टीकोन आत्मसात केले.

दलाई लामा यांच्या भेटीतून स्वातंत्र्याची प्रेरणा आणि श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून प्राणायामाच्या विविध क्रिया शिकायला मिळाल्या.
| Fingers should be pointed at Kashmiri Muslims? || Francois Gautier & Neeraj Atri (सौजन्य : Politically Incorrect – Neeraj Atri) |

🚩 Chattrapati Shivaji Maharaj Museum Pune 🚩(सौजन्य : Francois Gautier) |
४. ‘फॅक्ट’ प्रदर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय यांविषयी…
श्री. फ्रान्सिस गोतिए सांगतात, साडेचार लाख काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचा मी साक्षीदार आहे आणि त्यातूनच वर्ष २००४ मध्ये काश्मिरी पंडितांसाठी ‘फॅक्ट’ हे प्रदर्शन देहली येथून चालू केले.
श्री. फ्रान्सिस गोतिए यांनी केलेले आवाहन !
‘फॅक्ट’ प्रदर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय यांसाठी कुणाला दान करायचे असेल, तर पुढील ‘लिंक’वर संपर्क साधावा : (भारत आणि अमेरिका येथे आयकरात सवलत आहे)
त्यानंतर त्यांनी भारतीय इतिहासाचा गांभीर्याने अभ्यास चालू केला आणि त्यांना एक गोष्ट लक्षात आली की, औरंगजेब हा भारतीय इतिहासात महत्त्वाचा घटक होता. मग त्याच्या ‘फर्मानां’च्या आधारावर एक प्रदर्शन चालू केले, ज्याचा उद्देश खरा इतिहास समाजासमोर जावा. श्री श्री रविशंकर यांनी ‘फॅक्ट’ प्रदर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय यांसाठी जागा दिली. हे संग्रहालय निःशुल्क आहे आणि ते चालवण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या संघर्ष करावा लागत आहे. या संग्रहालयाला आजपर्यंत १५ सहस्र जणांनी भेट दिली असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या प्रदर्शनाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी; म्हणून संग्रहालयात प्रवेश निःशुल्क आहे.
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले