‘श्री भगवान महावीर जैन चॅरिटेबल ट्रस्ट’ची फोंडा पोलिसांकडे तक्रार

फोंडा, २४ जून (वार्ता.) बांदोडा येथे श्री भगवान नेमीनाथ मंदिर परिसर या वारसा स्थळी मोहरमच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला आणि मंदिराचे पावित्र्य राखा, अशी मागणी ‘श्री भगवान महावीर जैन चॅरिटेबल ट्रस्ट’ यांनी फोंडा पोलिसांकडे २३ जून या दिवशी केली आहे.
‘श्री भगवान महावीर जैन चॅरिटेबल ट्रस्ट’ यांचे बांदोडा येथे श्री भगवान नेमीनाथ मंदिर आहे. राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याकडे हे वारसा स्थळ म्हणून नोंद आहे आणि या ठिकाणाचे ‘जैन बस्ती’ असे अधिकृत नामकरण करण्यात आलेले आहे. या परिसरात गेल्या काही वर्षात १ मुसलमान कुटुंब वास्तव्यास आले आहे आणि गेली १-२ वर्षेे या ठिकाणी मोहरमच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर बकरा कापण्यात येत आहे. गतवर्षी हा प्रकार लक्षात आल्यानंतर ‘श्री भगवान महावीर जैन चॅरिटेबल ट्रस्ट’ने याविषयी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. गतवर्षी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या ठिकाणी मंडप घालण्यासाठी आणलेले वाहन कह्यात घेतले होते. ‘श्री भगवान महावीर जैन चॅरिटेबल ट्रस्ट’ने २३ जून या दिवशी दिलेल्या तक्रारीत गतवर्षीची पुनरावृत्ती टाळावी आणि गतवर्षी पोलिसांनी तक्रारीनंतर कोणती कारवाई केली ? याविषयी सविस्तर माहिती मागितली आहे. तक्रारीत नमूद केल्यानंतर यंदा मोहरम शुक्रवार, २६ जून या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मुसलमान समाजातील लोक २५ जून या दिवशी बकर्याची हत्या करत असतात. मंदिर परिसरात मुसलमान समाजाचे एकच घर असले, तरी त्या ठिकाणी मोहरमच्या पार्श्वभूमीवर मुसलमान समाजाचे अनेक जण एकत्र येतात आणि उघड्यावर बकरा कापतात. यामुळे या परिसराचे पावित्र्य नष्ट होण्याबरोबरच हा किळसवाणा प्रकार उघड्यावर होत असतो. ट्रस्टने या तक्रारीच्या प्रती पुरातत्व खाते, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक आणि राज्य गृह खाते यांनाही पाठवल्या आहेत.
‘श्री भगवान महावीर जैन चॅरिटेबल ट्रस्ट’च्या गतवर्षीच्या तक्रारीची राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने घेतली नोंद
बांदोडा येथे श्री भगवान नेमीनाथ मंदिर परिसर या वारसा स्थळी मोहरमच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी उघड्यावर बकरा कापण्यात आल्यानंतर त्याविषयी ‘श्री भगवान महावीर जैन चॅरिटेबल ट्रस्ट’ने पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने नोंद घेतली होती. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने यासंबंधी राज्य सरकारच्या गृह खात्याला पत्र लिहून याविषयी कोणती कारवाई केली ? याविषयी राज्य सरकारच्या गृह खात्याकडे अहवाल मागितला होता.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी नियोजनबद्ध शेती करावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक