असे कसे गुरुदेवा, तुझे नि आमचे हे नाते ।

‘एकदा मला परात्पर गुरु डॉक्टरांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) दुरून दर्शन झाले. बर्‍याच मासांनी (महिन्यांनी) मी त्यांना पाहिले. तो क्षण आणि दृश्य मला सतत आठवत होते. रात्री माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. डॉक्टरांना भेटल्यावर काही बोलताच येत नाही. माझे देहभान हरपून जाते आणि जेव्हा मी भानावर येते, तेव्हा भगवंत (प.पू. डॉक्टर) समोर नसतात.’ त्यानंतर मला पुढील ओळी सुचल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

असे कसे गुरुदेवा, तुझे नि आमचे हे नाते ।
तुलाच सर्व सांगायचे आणि तू समोर
येताच निःशब्द होण्याचे ।। १ ।।

कु. कौमुदी जेवळीकर

असे कसे गुरुदेवा, तुझे नि आमचे हे नाते ।
सर्व काही भान येण्यासाठीच करायचे (टीप १)
आणि तू समोर आल्यावर संपूर्ण भान हरपायचे ।। २ ।।

असे कसे गुरुदेवा, तुझे नि आमचे हे नाते ।
तुला साक्षी ठेवून सर्व काही करायचे
आणि तू जवळ असूनही तुझ्यापासून दूर रहायचे (टीप २) ।। ३ ।।

टीप १ : ‘देव सोबत आहे’ हे भान सतत रहाण्यासाठी करावयाचे साधनेचे प्रयत्न.

टीप २ : सूक्ष्मातून जवळ राहून स्थुलातून दूर रहायचे.

– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक