नवी देहली – काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून बोलणे झाले होते. भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणखी भक्कम करण्यासाठी पंतप्रधानांच्या अमेरिका दौर्याच्या दिशेने दोन्ही बाजू प्रयत्नशील आहेत. या भेटीचा दिनांक निश्चित करण्याचे काम चालू आहे. योग्य वेळी त्याची घोषणा केली जाईल, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्यात येणार आहे. यात १८ सहस्र भारतीय आहेत. त्याविषयी जैस्वाल म्हणाले की, भारत अवैध स्थलांतराला विरोध करतो. अमेरिकी अधिकार्यांसह भारतीय अधिकारी बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहेत. यासमवेतच अमेरिकेत कायदेशीर स्थलांतरासाठी आणखी मार्ग सिद्ध केले जात आहेत.
रशियामध्ये १६ भारतीय बेपत्ता असल्याचे प्रवक्ते जैस्वाल यांनी सांगितले. त्यांची माहिती घेण्यासाठी आम्ही रशियाच्या अधिकार्यांच्या संपर्कात आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.