फलक प्रसिद्धीकरता
हातकणंगले (कोल्हापूर) तालुक्यातील सरकारी गायरान भूमीवर ‘सुन्नत जमियत’ने अवैधपणे मदरसा बांधला होता. यासंदर्भातील कोणतीही कागदपत्रे जमियतने अनेकवेळा मुदत देऊनही सादर केली नाहीत. अखेर नगरपालिकेने सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा मदरसा पाडला.