अंजनगाव सुर्जी (जिल्हा अमरावती) येथे बांगलादेशी घुसखोरांच्या जन्म दाखल्याचा घोटाळा उघडकीस !

भाजपचे नेते किरीट सोमय्या (वर्तुळात)

अमरावती – जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना देण्यात आलेल्या जन्म दाखल्याच्या संदर्भात घोटाळा उघडकीस आला आहे. घोटाळ्याच्या चौकशीसाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या १३ जानेवारी या दिवशी या तालुक्यात येणार आहेत.

वर्ष २०११ च्या जनगणनेप्रमाणे अंजनगाव सुर्जी तालुक्याची लोकसंख्या १ लाख ६० सहस्र ९०३ इतकी आहे. यांपैकी २८ सहस्र १८० मुसलमानांची लोकसंख्या आहे. गेल्या ६ महिन्यांत जन्माच्या दाखल्यासाठी १ सहस्र ४५० हून अधिक अर्ज आले असून त्यांत १ सहस्र ४०० अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्यांचे असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

आधी मालेगाव आणि आता अमरावती येथील घटना पहाता बांगलादेशी घुसखोरांचा महाराष्ट्रात किती मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे, ते लक्षात येते ! यावर राज्य सरकार कसे नियंत्रण आणणार आहे ?