प्रयागराज – येथील पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून महाकुंभमेळ्याच्या परिसरातून ५५० संशयितांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली. खलिस्तानवादी आतंकवादी पन्नू, तसेच अन्य संघटनांचे आतंकवादी यांनी दिलेल्या धमकीनंतर ही कारवाई करण्यात आली. अशीच धमकी देणार्या बिहारमधील इयत्ता ११ वीत शिकणार्या एकाला अटक करून त्याची नुकतीच चौकशी करण्यात आली. उत्तरप्रदेश पोलीस आणि गुप्तचर विभाग यांच्याकडून त्रिवेणी संगम क्षेत्रातील पूल, वाहनतळ, अन्नछत्र, विविध चौक आदी ठिकाणर, तसेच विविध तंबूंवर लक्ष ठेवून संशयित दिसल्यास तत्काळ त्याची चौकशी करत आहेत.