CM Yogi Appeals In Prayagraj Mahakumbh : मुसलमानांनी हिंदूंना सनातन धर्माची प्रतीके शांततेत परत करावीत !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

  • उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

  • अशा प्रतीकांना मशिदीऐवजी वादग्रस्त रचना म्हणण्याचेही केले आवाहन

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – सनातन धर्माशी संबंधित प्रतीके मुसलमानांनी हिंदूंना शांततेत परत करावीत आणि यामध्ये कोणताही वाद होऊ नये, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुसलमानांना आवाहन केले. ते येथे ‘आज तक’ वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

योगी आदित्यनाथ यांनी मांडलेली सूत्रे –

१. इस्लाम येण्यापूर्वीपासून सनातन धर्म अस्तित्वात आहे !

श्रीहरि विष्णूचा १० वा अवतार संभलमध्ये जन्माला येणार आहे. आपल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे. आजकाल संभलमध्ये जे काही दिसते, ते सर्व सनातन धर्माशी जोडलेले आहे आणि याचे पुरावे सापडत आहेत. भारतात लिहिलेली सर्व पुराणे ३ सहस्र ५०० ते ५ सहस्र वर्षांपूर्वी रचली गेली होती. जेव्हा ही लिहिले गेली, तेव्हा या पृथ्वीवर इस्लाम नव्हता आणि केवळ सनातन धर्म होता. जेव्हा इस्लाम नव्हता, तेव्हा जामा मशीद कुठून आली ? ‘ऐन-ए-अकबरी’ (अकबराच्या राज्याची माहिती देणारे १६ व्या शतकातील पुस्तक) यामध्ये म्हटले आहे की, वर्ष १५२६ मध्ये संभलमध्ये आणि वर्ष १५२८ मध्ये अयोध्येत मंदिरे पाडण्यात आली अन् येथे वास्तू बांधण्यात आल्या. म्हणून जर हिंदूंनी ही ठिकाणे परत करण्याची मागणी केली, तर ती मान्य केली पाहिजे. जर त्यांचा धर्मग्रंथ असे म्हणत असेल, तर त्यांनी त्यांची चूक मान्य करावी. अशा परिस्थितीत, सनातनची प्रतीके त्यांना (हिंदूंना) शांततेने परत करावीत. अशी चिन्हे परत करण्यावरून कोणताही वाद होऊ नये.

२. वादग्रस्त वास्तूंना मशिदी न म्हणता वादग्रस्त रचना म्हणावी !

वादग्रस्त वास्तूंना मशिदी म्हणू नये. ज्या दिवशी आपण हे बोलणे थांबवू, त्या दिवशी लोक तिथे जाणे बंद करतील. इस्लाममध्ये हेदेखील खरे आहे की, कोणत्याही धर्माला दुखावून मशिदीसारख्या बांधलेल्या इमारतीत केलेली पूजा देवाला मान्य नाही. इस्लाममध्ये उपासनेसाठी कोणत्याही इमारतीची आवश्यकता नाही. ती सनातनमध्ये आहे. याविषयी कोणताही आग्रह असू शकत नाही.

३. हा देश मुस्लिम लीगच्या मानसिकतेने नव्हे, तर भारतीय विचारसरणीने चालवला जाईल.

४. भारताने नेहमीच जगभरातील छळग्रस्त लोकांना आश्रय दिला आहे.

५. नवीन भारताविषयी विचार करण्याची वेळ आली आहे.

६. वक्फ ‘बोर्ड’ नाही, तर ‘भू माफिया’ आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमानांनी हिंदूंच्या बळकावलेल्या वास्तू परत केल्या असत्या, तर आताची स्थिती निर्माणच झाली नसती. आताही अशा आवाहनामुळे मुसलमान हिंदूंना त्यांच्या वास्तू परत करण्याची शक्यता नाही. त्यामुळे हिंदूंच्या वास्तू हिंदूंना कायदेशीर लढाईद्वारेच मिळवाव्या लागतील, हीच वस्तूस्थिती आहे !