पालघर येथे विश्व हिंदु परिषदेचा स्तुत्य प्रयत्न !
(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)
पालघर – ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केलेल्या एकूण ५० कुटुंबांची हिंदु धर्मात घरवापसी करण्यात आली आहे. विश्व हिंदु परिषदेने यामध्ये साहाय्य केले आहे. यामध्ये एकूण ३८ महिला आणि १२ पुरुष यांचा समावेश आहे.
A total of 50 families who had converted to Christianity do #gharwapasi in Palghar!
A commendable effort by the Vishwa Hindu Parishad!
घरवापसी #NoConversion pic.twitter.com/XQffcQdk1l
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 12, 2025
त्यानंतर त्यांना महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले आहे. त्यांपैकी विक्रमगड तालुक्यातील १७ जणांची हिंदु धर्मात घरवापसी झाली. यांमध्ये ५ कुटुंबांचा समावेश असल्याची माहिती पालघर जिल्ह्यातील नरेश मराड यांनी दिली आहे. धर्मांतराच्या आमिषाला भुललेल्या हिंदूंचा पालघरमधील विठ्ठल मंदिराच्या समितीने त्यांचा सत्कार करत त्यांचे स्वागत करण्यात आले.