रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

१. श्रीमती सीता साहू (‘वाराणसी येथील मां श्रुंगारगौरी मंदिर’ दाव्‍यामधील वादी [पक्षकार/फिर्यादी]), वाराणसी, उत्तरप्रदेश.

अ. ‘या आश्रमात दिव्‍य अनुभूती येते. शांत वातावरणात अतिशय अलौकिक अनुभव येतो.

आ. मी येथे पुन्‍हा येऊ इच्‍छिते.’

२. श्री. पिंकू कुमार भुइयान (सदस्‍य, सारसी साहाय्‍यता समिती), हजारीबाग, झारखंड.

अ. ‘आश्रम पाहून परमोच्‍च शांती मिळाली, तसेच सुखद अनुभूती आली.

आ. माझे मन पूर्णपणे अध्‍यात्‍माकडे ओढले गेले.

इ. ‘जीवनात अध्‍यात्‍माची अत्‍यंत आवश्‍यकता आहे’, याची जाणीव झाली.’

३. श्री. रवींद्र मधुकर फाटे (अध्‍यक्ष, स्‍वराज्‍य नवनिर्माण फाऊंडेशन), अकोला, महाराष्‍ट्र

अ. ‘अद़्‍भुत ! अविश्‍वसनीय ! हे अध्‍यात्‍म आणि विज्ञान यांच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येक मनुष्‍य आपल्‍या समवेत जोडला जाऊ शकतो.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक