देवाची आवड असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कद्री (आंध्रप्रदेश) येथील चि. दिविज (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !  चि. दिविज या पिढीतील एक आहे !

१२.११.२०२४ (कार्तिक शुक्ल एकादशी) या दिवशी चि. दिविजचा प्रथम वाढदिवस आहे. त्या निमित्ताने दिविजच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. दिविज

चि. दिविज यास प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

________________________________

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. उत्साही

सौ. श्रीष

‘दिविज नेहमी हसतमुख असतो. त्याला पाहिल्यावर आम्हाला पुष्कळ आनंद होतो.

२. तत्परता

दिविजला एखादी कृती करण्यास सांगितल्यावर तो ती कृती लगेच करतो.

३. देवाची आवड

अ. दिविज झोपतांना हनुमान चालीसा म्हटल्यावरच झोपतो.

आ. एकदा त्याला घेऊन आम्ही जत्रेत गेलो होतो. तेथे देवळात इतरांनी त्याला ‘हाय, हेलो’, असे म्हटले असता त्याने त्यांना नमस्कार केला.

इ. देवाचे भजन चालू असल्यास तो त्या ठिकाणी सुमारे पाऊण घंटा थांबतो.

ई. ‘जय श्रीराम ।’ आणि ‘छत्रपति शिवाजी महाराज की जय ।’ या घोषणा दिविजला आवडतात. तो हात वर करून घोषणा देण्यातील आनंद अनुभवतो.

४. देवपूजेची खोली आवडणे

देवपूजेची खोली पाहून दिविजला पुष्कळ आनंद होतो. तो तिथेच रहाण्याचा हट्ट करतो.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

तो ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ हातात धरून त्यातील प्रत्येक पान पाहून आनंद व्यक्त करतो.’

– सौ. श्रीष, (चि. दिविज याची आई) कद्री, आंध्रप्रदेश. (२८.५.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.