नेदरलँड्स येथे ज्यूंवरील मुसलमानांच्या आक्रमणाचे प्रकरण
ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) – ज्यूंविरोधी आक्रमणे घृणास्पद आहेत. ज्यूंचा छळ पुन्हा त्या इतिहासाच्या काळ्या क्षणांची आठवण करून देतो. आम्ही इस्रायली आणि डच (नेदरलँड्स) अधिकार्यांच्या संपर्कात आहोत. ज्यूंवरील आक्रमणांविरुद्ध अविरतपणे लढले पाहिजे, अशा शब्दांत अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेदरलँड्स येथे मुसलमानांनी ज्यूंवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला. येथे मॅकाबी तेल अविव आणि अजाक्स यांच्यातील फुटबॉल सामन्यानंतर हे आक्रमण झाले होते. या वेळी पॅलेस्टाईन समर्थक मुसलमानांनी अनेक इस्रायली नागरिकांवर आक्रमण केले. यात ५ जण घायाळ झाले. या आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी ६२ जणांना अटक केली.
या आक्रमणाचा नेदरलँड्सचे पंतप्रधान डिक शूफ यांनीही निषेध केला. ‘वर्ष २०२४ मध्ये नेदरलँड्समध्ये अशी घटना घडू शकते, याविषयी मला अत्यंत लाज वाटते. आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही दोषींविरुद्ध कारवाई करू’, असे शूफ म्हणाले.
इस्रायलने पाठवली २ मालवाहू विमाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ॲमस्टरडॅममधील वैद्यकीय आणि बचाव पथक, तसेच इस्रायली नागरिक यांना साहाय्य करण्यासाठी २ मालवाहू विमाने पाठवली.