|
ढाका (बांगलादेश) : काही आठवड्यांपूर्वी बांगलादेशातील हिंदु नेत्यांकडून ‘सनातन प्रभात’ला माहिती मिळाली होती की, तेथील मुसलमानच नाही, तर सैन्य, सरकार, तसेच प्रशासन हिंदूंच्या मुळावर उठले आहे. ते आता प्रत्ययास येत आहे. ‘इस्कॉन’च्या बांगलादेशातील प्रमुखांपैकी एक असलेले चितगाव येथील इस्कॉनचे सचिव चिन्मय दास ब्रह्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ते एकटेच नाही, तर आणखी १८ अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या विरुद्धही गुन्हे नोंदवले गेले आहेत. सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात १ नोव्हेंबरला हिंदूंकडून आंदोलने करण्यात आली.
🛑 Bangladesh : 18 Hindu Organizations, Including ISKCON Secretary, Charged with Treason
📌 Accusation of hoisting ISCKON’s saffron flag over Bangladesh’s flag
📌 Strong protests by Hindus in Chittagong against actions taken against devout Hindus
“The flag with the moon and… pic.twitter.com/gcdCpuqDUx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 1, 2024
चिन्मय दास यांनी २५ ऑक्टोबरला चितगावात एका मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी बांगलादेशाच्या राष्ट्रध्वजाच्या वर ‘इस्कॉन’चा भगवा ध्वज फडकावल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे. यातून बांगलादेशाच्या राष्ट्रध्वजाला कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी २ जणांना अटकही करण्यात आली आहे. चिन्मय दास हे हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सातत्याने मोर्चे आणि आंदोलने यांचे आयोजन करत आहेत.
चंद्र आणि तारा असणारा ध्वज बांगलादेशाचा राष्ट्रध्वज नाही ! – चिन्मय दासदास यांनी त्यांच्या विरोधात झालेल्या कारवाईवर सांगितले की, मोर्चाच्या दिवशी काही लोकांनी चंद्र आणि तारा असणार्या ध्वजाच्या वर भगवा ध्वज फडकवला होता. चंद्र आणि तारा असलेला ध्वज बांगलादेशाचा राष्ट्रध्वज नाही. ध्वज फडकवणारे कोण होते, हे मला ठाऊक नाही; पण संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. |
संपादकीय भूमिकाइस्लामी बांगलादेशी सरकारकडून हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यासाठी प्रयत्न केले जाणे, यात काय आश्चर्य ? |