अश्लील छायाचित्रे काढून केले ब्लॅकमेल
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हसनाबाद भागातील डॉ. नूर आलम सरदार याच्या चिकित्सालयात त्याने एका महिला रुग्णावर अनेकदा बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, ती उपचारासाठी चिकित्सालयामध्ये गेली होती. त्या वेळी डॉ. नूर आलम याने भूल देण्याचे इंजेक्शन दिल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच डॉ. नूर याने पीडित महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी बेशुद्ध असतांना तिची अश्लील छायाचित्रेही काढली. ही छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी देत तिच्याकडे ४ लाख रुपयांची मागणी केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नूर आलम याला अटक केली.
महिलांवरील गुन्ह्यांमध्ये बंगाल देशात चौथ्या क्रमांकावर !
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या संदर्भात बंगाल चौथ्या क्रमांकावर आहे. वर्ष २०२२ च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीमध्ये बंगालमध्ये महिलांवरील ३४ सहस्र ७३८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ६५ सहस्र ७४३ प्रकरणांसह उत्तरप्रदेश पहिल्या, तर त्यापाठोपाठ महाराष्ट्र (४५ सहस्र ३३१ प्रकरणे) आणि राजस्थान (४५ सहस्र ५८ प्रकरणे) आहेत.
संपादकीय भूमिकाअशा आरोपींना शरीयत कायद्यानुसार शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |